Join us

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 20:29 IST

1 / 11
बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध डायरेक्टर आणि कोरीओग्राफर फराह खान (From skipping workouts to climbing 28 floors a day) नेहमीच चर्चेत असते. सध्या फराह खान तिच्या वेटलॉसमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोणत्याही बड्या, सुप्रसिद्ध सेलिब्रिटीजनी वेटलॉस केलं की, त्यांनी हे नेमकं कसं केलं असेल अशी उत्सुकता आपल्याला कायम असतेच.
2 / 11
फराह खान (Farah Khan) नुकतेच तिचे वजन कमी (Farah Khan climbs 28 floors daily for fitness) करण्यात यशस्वी झाल्याने, तिचे वेटलॉस फंडे (Twice A Day 28 Floors Later The Real Story Behind Farah Khans Transformation) सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
3 / 11
खरंतर जिने चढणं - उतरणं हा एक उत्तम व्यायामच मानला जातो. परंतु अनेकांना जिने चढणे - उतरणे म्हणजे जीवावर येते. परंतु फराहने हाच वेटलॉस फंडा वापरुन आपलं वजन कमी केलं आहे.
4 / 11
नुकत्याच झालेल्या मुलाखती आणि सोशल मिडिया पोस्टद्वारे, फराह खानने तिने वजन कसे कमी केले याचे सिक्रेट शेअर केले आहे.
5 / 11
फराह सांगते, व्यायाम म्हणजे मला खूप दमवणारा वाटत असे, त्यामुळे मी व्यायाम करणे सोडून देत असे.
6 / 11
परंतु त्यानंतर फराहने आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर योगेश भटेजा यांच्या मदतीने आपल्या लाइफस्टाइलमध्ये अनेक बदल केले.
7 / 11
फराह खान वजन कमी करण्यासाठी दिवसांतून २ वेळा २८ मजले चढून जात असे. आता तिची ही सवय तिच्या डेली रुटीन आणि फिटनेसचा एक महत्वाचा भागच झाली आहे.
8 / 11
तिच्या या फिटनेस रुटीनमुळे तिचे फक्त वजनच कमी नाही झाले तर, तिला दिवभर उत्साही आणि उर्जावान राहण्यास देखील मदत झाली.
9 / 11
फराहचे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर योगेश भटेजा यांच्या मते, लो इंटेन्स वर्कआऊट जरी नियमित न चुकता केला तरी हळूहळू वजनात फरक दिसू शकतो.
10 / 11
जिना चढणे - उतरणे हा एक हृदय व रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे. याचबरोबर, कॅलरीज देखील बर्न करण्यात मदत करते.
11 / 11
तुम्ही देखील फराह खानचा हा वेटलॉस फंडा वजन कमी करण्यासाठी फॉलो करु शकता. परंतु पहिल्याच दिवशी २८ मजले चढून जाण्याची गरज नाही. लहान सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. यामुळे वजन कमी करण्यास नक्कीच फायदा होईल.
टॅग्स : वेट लॉस टिप्सफराह खानआरोग्यफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स