शरीरातील व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करणारे ५ शाकाहारी पदार्थ, सगळी दुखणी लगेच थांबतील
Updated:February 5, 2025 16:56 IST2025-02-05T16:40:47+5:302025-02-05T16:56:03+5:30

शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर खूप थकवा येतो. सतत डोकं दुखतं, अशक्तपणा जाणवायला लागतो, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, हातापायाला मुंग्या येतात, नर्व्हस सिस्टिमवरही त्याचा परिणाम होतो. ही सगळी दुखणी बरी करायची असतील तर व्हिटॅमिन B12 देणारे पदार्थ योग्य प्रमाणात खायला हवे (how to get rid of vitamin B12 deficiency?). ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(vitamin B12 rich veg food)
व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात देणारा पहिला पदार्थ आहे दूध. दुधामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण चांगले असते. त्यामुळे नियमितपणे दूध प्यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.(superfood for vitamin B12)
चीजमधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळते. त्यातही मोझेरेला, स्विस हे चीजचे प्रमाण व्हिटॅमिन बी १२ च्या बाबतीत अधिक चांगले असतात, असं मानलं जातं.
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास प्लेन योगर्ट खावे. नाश्ता किंवा स्नॅक्समध्येही तुम्ही योगर्ट खाऊ शकता.
शाकाहारी लोकांसाठी पनीर हा व्हिटॅमिन बी १२ देणारा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. पनीर लहान मुलांनाही आवडतेच. त्यामुळे या वयापासूनच त्यांना ते योग्य प्रमाणात द्यायला सुरुवात करा.
व्हिटॅमिन बी १२ भरपूर प्रमाणात देणारा आणखी एक शाकाहारी पदार्थ म्हणजे मशरूम. शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर मशरुमचे विविध पदार्थ नियमितपणे खायला हवे.