लवकर वजन कमी करण्यासाठी चालायचं की धावायचं? जाणून घ्या, करेक्ट फिटनेस मंत्र
Updated:February 15, 2025 15:09 IST2025-02-15T15:01:03+5:302025-02-15T15:09:52+5:30
वजन लवकर कमी करण्यासाठी धावणं की चालणं यापैकी कोणतं जास्त चांगलं आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया...

वजन कमी करण्यासाठी अनेक जण आता विविध गोष्टी करत असतात. त्यातली पहिली पायरी म्हणजे धावणं आणि चालणं. कारण हे दोन्ही शारीरिक व्यायाम तुमचं वजन कमी करण्यास मदत करतात.
लोकांच्या मनात अजूनही एक प्रश्न आहे की, वजन लवकर कमी करण्यासाठी धावणं की चालणं यापैकी कोणतं जास्त चांगलं आहे. याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊया...
धावण्याचे फायदे
लवकर वजन कमी करण्यासाठी धावणं हे अधिक प्रभावी आहे.अर्धा तास धावल्याने तुमच्या शरीरातील ४०० ते ६०० कॅलरीज सहज बर्न होऊ शकतात.
धावणं तुमचा मूड सुधारण्यास देखील मदत करतं. धावण्यामुळे तुमच्या शरीरात एंडोर्फिनचा स्राव वाढतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो.
धावण्यामुळे तुमचे स्नायू आणि हाडे देखील मजबूत होतात. यामुळे पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते.
चालण्याचे फायदे
ज्या लोकांनी आताच चालायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी चालणं चांगलं आहे. यामुळे तुमचं शरीर हळूहळू शारीरिक हालचालींसाठी तयार होतं.
चालण्यामुळे केवळ चरबी कमी होत नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारतं. यामुळे तुमची पचन प्रक्रिया देखील सुधारते.
चालण्याने तुमचा मूड सुधारतो आणि तुमचे स्नायू सक्रिय होतात. ३० मिनिटांच्या चालण्याने १५० ते २०० कॅलरीज बर्न होऊ शकतात.
धावण्याचे आणि चालण्याचे फायदे लक्षात घेता, लवकर वजन कमी करण्यासाठी धावणं हे अधिक फायदेशीर ठरू शकतं.
चालणं आणि धावणं यासोबत रोज नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतल्यास लवकर वजन कमी होऊ शकतं.