Join us   

वेटलॉससाठी अत्यंत उपयोगी ४ हेल्थ ड्रिंक्स, पचन होईल झ्टपट आणि वजन उतरेल सरसर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 11:59 AM

1 / 6
वजन कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताय, पण वजन कमी होत नसेल तर हा एक उपाय करून पाहा. यामध्ये शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम क्रिया वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे हेल्थ ड्रिंक्स आपण पाहणार आहोत. या ड्रिंक्सच्या मदतीने पचन क्रिया जलद होईल आणि वजन सरसर कमी होईल.
2 / 6
ज्यांच्या शरीराची चयापचय क्रिया थोडी संथ असते, त्यांना वजन वाढीचा खूप त्रास जाणवतो. याचे कारण म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही, त्यामुळे मग शरीरावरची चरबी वाढू लागते. म्हणूनच अशा लोकांनी पुढे दिलेली काही सरबते घेऊन पाहावीत. पचन क्रिया वाढीसाठी ती नक्कीच उपयुक्त ठरतील.
3 / 6
हेल्थ ड्रिंक्सपैकी सर्वात पहिलं आहे ग्रीन टी. ग्रीन टी मध्ये पचन क्रियेला चालना देणारे काही ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दिवसातून एक किंवा दोन कप ग्रीन टी घ्यायला हरकत नाही.
4 / 6
एक टेबलस्पून ॲपल साईड व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यात टाका. हे पाणी जेवण करण्यापुर्वी प्या. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.
5 / 6
लिंबू पाणी हा एक अगदी स्वस्त, साेपा आणि भरपूर फायदे देणारा उपाय आहे. लिंबातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. तसेच बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाणी घेणे फायदेशीर ठरते.
6 / 6
आल्यामध्ये काही थर्मोजेनिक गुणधर्म असतात. त्यामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून एकदा जिंजर टी पिण्याचा सल्ला दिला जातो.
टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स