वजन आणि बीपी चुकूनही वाढू न देणारे ६ चविष्ट पदार्थ, रोज नाश्त्याला खा पोटभर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 5:01 PM 1 / 9निरोगी राहण्यासाठी नाश्ता महत्वाचा (Morning Breakfast). नाश्ता केल्यानं दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (Healthy Breakfast). काही जण वेट लॉस करण्यासाठी सकाळचा नाश्ता स्किप करतात. पण यामुळे वजन खरंच कमी होते का?(What is a healthy normal breakfast that doesn't increase weight?).2 / 9वजन कमी करणं हा जर उद्देश असेल तर, नाश्ता टाळण्याऐवजी खावे. सकस आणि पौष्टीक्तेने परिपूर्ण नाश्ता केल्याने फक्त वजन नियंत्रित राहत नाही, तर शरीराला इतर आरोग्यदायी फायदेही मिळतात. 3 / 9हेल्दी नाश्ता रक्तातील साखरेची पातळीही राखण्यासही मदत करते. ज्यामुळे अचानक भूक किंवा जास्त खाणे आपण टाळतो. याव्यतिरिक्त हाय प्रोटीन, फायबर समृद्ध नाश्ता केल्याने पोट अधिक वेळ भरलेले राहते. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. 4 / 9वजन वाढू नये, यासह आरोग्याला फायदे मिळावे म्हणून नक्की कोणते पदार्थ खावे? याची माहिती आहारतज्ज्ञ सना गिल यांनी दिली आहे. 5 / 9नाश्त्याला आपण स्प्राउट्स सॅलड खाऊ शकता. स्प्राउट्समध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. स्प्राउट्समध्ये कमी कॅलरीज आणि जास्त प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू देखील मजबूत होतात.6 / 9इडली सांबार हा बेस्ट आणि हेल्दी दाक्षिणात्य नाश्ता आहे. इडलीमध्ये तांदूळ आणि उडदाची डाळ असते. जे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. सांबारमध्ये भाज्या आणि डाळी असतात. ज्यामुळे पौष्टिकता वाढते. 7 / 9दलिया हा फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. यात भाज्या घालून खाल्ल्याने त्यातील पोषक घटक वाढतात. लापशी पचायला सोपी असते आणि पोट जास्त काळ भरते. 8 / 9मूग डाळ चिला ज्याला आपण डोसाही म्हणू शकतो. यात प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामध्ये आपण भाज्याही मिसळून खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. यासह वेट लॉससाठीही मदत होईल. 9 / 9पोहे हा हेल्दी आणि उत्तम नाश्ता आहे. पोहे बनवायलाही सोपे असतात. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीराला फायदाच होतो. वेट लॉससोबत ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications