जंकफूड- तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ५ पदार्थ, अपचन- ॲसिडीटी होणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2024 4:36 PM 1 / 10कितीही टाळलं तरी जंकफूड खाण्याचा, तेलकट- मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह होतोच. असे पदार्थ खाल्ले की मग बऱ्याच जणांना ॲसिडीटी- अपचनाचा त्रास होतो. 2 / 10असा त्रास होऊ नये म्हणून जंकफूड किंवा इतर तेलकट- तुपकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी sakshilalwani_nutritionist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पदार्थांनंतर खावेत, ते पाहा...3 / 10डेझर्ट खाणं झालं असेल तर त्यानंतर भरपूर पाणी प्या.4 / 10मसालेदार पदार्थांचं खाणं झालं असेल तर त्यानंतर पेर किंवा संत्री- मोसंबी खा.5 / 10इंस्टंट नूडल्स खाल्त्यानंतर एक सफरचंद खा.6 / 10तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर सेलेरी ज्यूस म्हणजेच अजमोदचा रस प्यावा.7 / 10बार्बेक्यू फूड खाल्लं असेल तर त्यानंतर एक केळ आवर्जून खा.8 / 10वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, कुरकुरे असे क्रॅकर्स फूड खाल्ल्यानंतर ओट्स खा..9 / 10हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही खाल्लेल्या जंकफूडमधील किंवा तेलकट- तुपकट पदार्थांमधील अतिरिक्त शुगर शरीराबाहेर पडण्यास मदत होते.10 / 10या फळांमधले ॲण्टीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स पचनासाठी चांगले असलेले गुड बॅक्टेरिया आतड्यांमध्ये तयार करतात. त्यामुळे अपचन, ॲसिडीटी असा त्रास होत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications