व्यायाम करण्यापुर्वी केळी खाण्याचे ५ फायदे, अनेक सेलिब्रिटी वर्कआऊट करण्याआधी केळी खातात, कारण.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 1:00 PM 1 / 8फिटनेस टिकविण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम करतात. पण बऱ्याचदा व्यायाम केल्यानंतर खूप थकवा येतो. कित्येकांना तर व्यायाम झाल्यानंतर खूप खा- खा होते.2 / 8व्यायाम करण्यासाठी आणि व्यायाम केल्यानंतरही आपली उर्जा टिकून राहावी यासाठी काही पदार्थ आवर्जून खाणं गरजेचं असतं. काही पदार्थ तुम्ही व्यायाम करण्याआधी तर काही पदार्थ व्यायाम केल्यानंतर खाणं आवश्यक आहे. व्यायाम करण्याआधी जे कोणते पदार्थ खाणं गरजेचं आहे, त्यापैकी सगळ्यात पहिलं फळ म्हणजे केळी.3 / 8म्हणूनच तर अनेक सेलिब्रिटीही वर्कआऊटच्या आधी न विसरता केळी खातात. वर्कआऊट करण्याआधी केळी खाणं का गरजेचं आहे ते पाहा...4 / 8Food Quality and Safety journal यांनी २०१८ साली केलेल्या अभ्यासानुसार केळीमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात जे ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे मग वर्कआऊट करण्यासाठी तुम्हाला भरपूर एनर्जी मिळते. 5 / 8व्यायाम करताना खूप घाम येतो. त्यातून शरीरातलं पोटॅशियम बाहेर पडतं. पोटॅशियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे स्नायुंना थकवा येतो. तो कमी करण्यासाठी केळी खाणं गरजेचं आहे. कारण केळीमधून उत्तम प्रमाणात पोटॅशियम मिळतं. 6 / 8केळी पचायला खूप सोपी आहे. त्यामुळे तिचं पचन लवकर होत असल्याने तुम्हाला व्यायाम करताना पचन संस्थेशी संबंधित कोणताही त्रास होते नाही.7 / 8केळीमधून कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६ चांगल्या प्रमाणात मिळतात. वर्कआऊटनंतर येणारा स्नायूंचा, शरीराचा थकवा घालविण्यासाठी हे पदार्थ उपयुक्त ठरतात.8 / 8केळीमधून फायबर आणि इलेक्ट्रोलाईट्स मिळतात. त्यांचा उपयोग शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी होतो. तसेच फायबर असल्याने शरीरातली उर्जा अधिककाळ टिकून राहाते. आणखी वाचा Subscribe to Notifications