'या' गोष्टींमध्ये आहेत खूप कमी कॅलरीज; वजन आपोआप होईल कमी अन् लठ्ठपणापासून सुटका
Updated:January 1, 2025 18:06 IST2025-01-01T17:46:35+5:302025-01-01T18:06:04+5:30
कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात आणि जे खाल्ल्याने वजन कमी होतं ते जाणून घेऊया...

वजन कमी करण्याच्या आहारामध्ये अनेकदा कमी कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश होतो. कमी कॅलरी असलेले पदार्थ हे वेट लॉस जर्नीतील महत्त्वाचा भाग आहेत. या पदार्थांनी पोट तर भरतं पण फॅट मिळत नाही.
यामध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आहेत आणि ते पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत. कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात आणि जे खाल्ल्याने वजन कमी होतं ते जाणून घेऊया...
काकडी
१०० ग्रॅम काकडीत ४ कॅलरीज असतात. पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने, काकडी खाल्ल्याने शरीराला पूर्ण हायड्रेशन मिळतं जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं. अशा परिस्थितीत काकडीने पोट भरतं पण कॅलरीजही वाढत नाहीत.
पालक
१०० ग्रॅम पालकातून शरीराला २३ कॅलरीज मिळतात. पालक कमी कॅलरीयुक्त पदार्थांमध्ये येतं. पालक खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स चांगल्या प्रमाणात मिळतात. पालक खाल्ल्याने शरीरातील लोह वाढते, त्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं.
टोमॅटो
१०० ग्रॅम टोमॅटोमध्ये १८ कॅलरीज असतात. टोमॅटो वेट लॉस फूड आहे. तसेच शरीराला भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स देखील मिळतात. अशा परिस्थितीत टोमॅटो सलाडप्रमाणे खाऊ शकतो. वजन कमी करण्याच्या आहारात टोमॅटो आणि काकडीच्या सॅलडचा समावेश केल्याने फॅट बर्न करण्यास मदत होते.
मशरूम
१०० ग्रॅम मशरूममध्ये २२ कॅलरीज असतात. मशरूमचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. कमी कॅलरी आहारात अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध मशरूमचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
मुळा
वजन कमी करण्याच्या पदार्थांमध्ये मुळा देखील समाविष्ट आहे. १०० ग्रॅम मुळ्यामध्ये १६ कॅलरीज असतात. अनेकांना मुळ्याची भाजी आवडते.
फ्लॉवर
फ्लॉवर खाल्ल्याने पोट भरतं पण फॅट वाढत नाही. १०० ग्रॅम फ्लॉवरपासून शरीराला २५ कॅलरीज मिळतात. अशा परिस्थितीत फ्लॉवरचे वेगवेगळे चविष्ट प्रकार करता येतात.