झूट बोले कौआ काटे.. पण म्हणून काही कुणी खोटं बोलणं सोडत नाही. त्यातही प्रेमात पडलेले, नुकते लग्न झालेले, ठरलेले एकमेकांना दुखवायचं नाही म्हणून खोटं बोलतात. पण किरकोळ खोटं बोलणं आणि सतत खोटं बोलून जोडीदाराला फसवणं यात फरक असतो. काही जण खरं लपवण्यासाठी तर, काही जण चूक पकडली जाऊ नये म्हणून खोटं बोलतात. पण मग आपला बॉयफ्रेंड आपल्याशी सतत खोटं बोलून आपल्याला फसवतोय हे कसं ओळखाल?(3 signs your partner might be lying to you)
बॉडी लँग्वेज पाहा..
संवाद साधताना नेहमी एकमेकांच्या देहबोलीकडे लक्ष द्या. तो खोटं बोलताना नजर चोरतो का? काही अस्वस्थ लकबी करतो करा, लक्ष ठेवा.
'तो' प्रियकर आहे की भूत? गायब होतो, कॉल आणि मेसेजला रिप्लाय करत नाही? मुद्दाम करतो की..
आवाज बदलतोय?
जोडीदार आपली बाजू मांडत असताना किंवा बोलताना त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. खोटं बोलत असताना व्यक्तीचे बोलण्याचे टोन बदलते. आवाजाकडे लक्ष द्या, अडखळतो का, तेच ते बोलतो का, संदर्भ चुकतो का?
शब्द कसे कोणते निवडतो?
बहुतांशवेळा, खोटं लपवण्यासाठी नवीन शब्दांचा वापर करतात. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका अभ्यासानुसार, खोटे बोलणारे शपथ या शब्दाचा वापर करतात, प्रत्येक गोष्टीत शपथ घेतो असे म्हणतात. खोटं बोलताना जास्त विचार करतात, लपवाछपवी दिसते शब्द आणि संदर्भात.
जुदा है मगर बेवफा तो नहीं! लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवायची तर ४ गोष्टी विसरु नका
अशावेळी काय करायचे?
१. प्रियकराच्या खोट्या गोष्टींसाठी स्वतःला दोष देणे टाळा. आपण तक्रार करूनही ते जर बदलत नसतील तर, वाईट वाटून घेऊ नका. ते स्वतः त्यांच्या खोटेपणा व वागणुकीसाठी जबाबदार आहेत.
२. खोटं पकडलं गेलं तर त्याची जाणीव स्पष्ट शब्दात करुन द्या. टोमणे मारु नका पण लक्षात आणून द्या की हे सतत खोटं बोलणं चालणार नाही.
३. खोटं का बोलतोय त्याची कारणं समजून घ्या. मात्र ती सवय किंवा लपवाछपवी, फसवणूक असेल तर दुर्लक्ष करु नका.
हे.