प्रेमविवाह असो की अरेंज मॅरेज, लग्नानंतर पतीपत्नीत वाद होणं, एकमेकांच्या सवयी अजिबात न आवडणं हे तसं साहजिकच असतं. मात्र काही सवयी इतक्या खटकतात की नवरा बायकोत आणि घरात भांडणं होतात. अनेकांना वाटतं की काय लहानसहान कारणावरुन भांडतात मात्र अनेकदा त्या लहान सवयी किंवा गोेष्टीत नात्यात जास्त त्रास देतात. महिलांना अनेकदा आपल्या नवऱ्याच्या अशाच काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत.
माहेरच्यांची खिल्ली उडवणं
नवऱ्यानं बायकोच्या घरातील सदस्यांबद्दल काही वाईट बोलले तर तिला खूप राग येतो. आई-वडील, भावंड किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची खिल्ली नवरा उडवतो तेव्हा पत्नीला ते अजिबात आवडत नाही. नवऱ्याची हीच सवय त्यांच्यात भांडणाचे कारण बनते.
पत्नीला रंगरुपावरुन टोमणे मारणे
कोणतीही व्यक्ती जेव्हा तुमच्या दिसण्यावर किंवा शारिरीक दिसण्यावर टिप्पणी करते तेव्हा त्याचा राग येणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे, जर पती आपल्या पत्नीच्या दिसण्याची खिल्ली उडवत असेल, तिच्या वजनेवर, उंची या रंगावर नकारात्मक कमेंट्स करत असेल तर साहजिकच पत्नीला या गोष्टीचा त्रास होतो. त्यांच्यामध्ये भांडणं होतात.
वारंवार चुका काढणे
कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. काही कमतरता असणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा नवरा बायकोमधील असलेली वाईट बाजू आणि चुका वारंवार सांगत असेल. तर, निश्चितच बायको नाराज होते.
दुसऱ्या महिलेची प्रशंसा
प्रेमामध्ये जेलसी असणे स्वाभाविक आहे, एकमेकांवर असलेलं प्रेम आणि काळजी यामुळे अनेकदा संशय मनात निर्माण होते. कधी कधी पती पत्नीची तुलना आपल्या मैत्रीण, शेजारीण किंवा इतर महिलेशी करतो. त्यामुळे कुठेतरी तिचा आत्मविश्वास कमी होतो. कोणत्याही महिलेला तिच्यासमोर आपल्या पतीने दुसऱ्या महिलेची स्तुती केलेली आवडत नाही आणि पटत देखील नाही. त्यामुळे अधिक गैरसमज आणि भांडणे होण्याची शक्यता निर्माण होते.