रिलेशनशिप (Relationship). वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. एकमेकांना वेळ द्यावा लागतो (Relationship tips). जोडीदाराच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. इंटरनेटच्या युगात तर आपण सतत चोवीस तास मोबाईलद्वारे पार्टनरसोबत कनेक्ट राहतो. मेसेज करून आपण आपल्या पार्टनरबद्दल अपडेट घेत राहतो.
परंतु, चॅटिंगमधून (Chatting) आपल्या भावना योग्यप्रकारे त्यांच्यापर्यंत पोहचतीलच असे नाही. म्हणून चॅटिंग करतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर गैरसमज होतात, भांडणं होतात आणि प्रकरण ब्रेकअपपर्यंत जाऊ शकतं(4 Texts To Never Send A Partner, No Matter How Angry You Are).
चॅटिंग करताना कोणते मेसेज किंवा विषय काढू नयेत?
जुने विषय
अनेकवेळा जोडीदाराशी वाद होतात. पण ते संपवून टाकावे. पुन्हा पुन्हा बोलताना जुन्या विषयावर वाद घालणं, जुने मुद्दे उकरुन जुन्याच मुद्द्यांवर बोलत राहिल्यास वाद वाढू शकतो. त्यामुळे असे गंभीर विषय चॅटिंगसाठी नाही तर प्रत्यक्ष भेटीसाठी राखून ठेवा, तेव्हा बोला.
हिवाळा सुरु होताच हातपाय काळेकुट्ट झाले? खोबरेल तेलात घाला १ गोष्ट- पाहा मऊमऊ जादू
एका शब्दात रिप्लाय किंवा इमोजी
जेव्हा जोडीदार भावूक होऊन बोलत असेल तर, मेसेजला एका शब्दात उत्तर देणं टाळा. यामुळे त्यांना वाईट वाटू शकते. जर पार्टनर वारंवार मेसेज करत असेल तर, जोडीदारासोबत प्रेमाने शब्द बोला. मनमोकळेपणाने बोला. यामुळे बॉण्डिंग नक्कीच वाढेल.
रागाने प्रतिसाद देणे टाळा
जर आपली कोणत्याही गोष्टीवरून चिडचिड झाली असेल तर, मेसेजमधून पार्टनरवर राग काढू नका. अनेक वेळा रागाच्या भरात आपण काहीतरी लिहून आपल्या जोडीदाराला पाठवतो. ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकते. त्यामुळे शक्यतो अशावेळी शांत राहा.
लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..
कुटुंब किंवा मित्रांबद्दल वाईट बोलू नका
नात्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी जोडीदाराला जेव्हा मेसेज कराल, तेव्हा फक्त चांगल्याच गोष्टी बोला. मेसेजमध्ये त्यांच्या मित्र किंवा मित्रपरिवाराविषयी वाईट बोलू नका. यामुळे नात्यात कटुता येऊ शकते. त्यांच्या कुटुंबियांबद्दल किंवा मित्रांबद्दल चुकीचे बोलल्याने त्यांचे मन दुखू शकते.