शारीरिक संबंध पूर्णपणे इन्जॉय करण्यासाठी शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. मात्र अनेकींना पायांमध्ये वेदना होणं हे खूपच कॉमन आहे. पण पोटाच्या खालच्या भागात, मांड्यांमध्ये गोळे येतात. प्रचंड पाय दुखतात. त्यानं मानसिक आणि शारीरिकही वेदना सहन कराव्या लागतात. (4 tips will help you to avoid muscle cramp during sex)
मुळात असं का होतं?
हेल्थ शॉट्सच्या रिपोर्टनुसार सेक्सदरम्यान मासपेशींमध्ये वेदना किंवा क्रॅम्प येणं खूपच कॉमन आहे. बहुतांश लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्यामते डिहाइड्रेशन, थकवा, जास्त घाम येणं यामुळेही त्रास अचानक होऊ शकतो.
उपाय काय?
१. सेक्स पोझिशन बदलून पाहा. यामुळे मसल्सवर दास्त दबाव येत नाही. अशावेळी ज्या स्थितीत जास्त ताकद लावावी लागणार नाही अशी पोझिशन निवडा.
२. अनेकदा पोटॅशियमच्या कमतरतेमुळे मासपेशींमध्ये क्रॅम्प येतात. पोटॅशियमयुक्त आहार घेतल्यानं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं. पोटॅशियम शरीरात योग्य प्रमाणात असण्यसाठी संत्री, बटाटा, टोमॅटो, अननस या पदार्थांचा आहारात समावेश करा.
३. फळं, ड्रायफ्रुट्स, सोयाबीन, तीळ, ऑलिव्ह यामध्ये शरीराला पोषक घटक देणारी तेलं असतात. यामुळे शरीर बळकट होते. पालक आणि ब्रोकोलीसारख्या पालेदार भाज्यांमध्ये व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. एंटी ऑक्सिडेंट्सयुक्त व्हिटामीन इ शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत बनवण्याचे कार्य करते. व्हिटामीन बी कॉम्प्लेक्सचा आहारात समावेश करा.
४. आपण खाण्यापिण्याकडे कितीही लक्ष दिलं तरी. खाण्यापिण्यात काहीतरी कमतरता राहतेच. यामुळे शरीरातील विविध अंगांमध्ये वेदना जाणवतात. अशावेळी आहारात अंडी, मासे, डाळींचा समावेश करा. याशिवाय व्हिटामीन बीची कमतरता पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं सप्लीमेंट्स घ्या.
५. सेक्सकरण्याआधी नंतर भरपूर पाणी प्या.