Join us  

नात्यात ना ओढ उरली ना प्रेम, असं वाटतं? करा ४ साेप्या गोष्टी-परत येईल प्रेमातला रोमांच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 3:34 PM

4 Ways to Rekindle the Spark in Your Relationship : नात्यात दुरावा नको असल्यास प्रत्येक जोडप्याने घ्यावी ४ गोष्टींची काळजी..

नातं नवरा - बायकोचं असो किंवा प्रियकर - प्रेयसी (Relationship Tips). नात्यात प्रेम आणि विश्वास हे दोन स्तंभ महत्वाचे ठरतात. प्रेमात ७ टप्पे असतात. या ७ टप्प्यातून प्रत्येक नातं जातं (Spark in Love). पण बऱ्याचदा नात्यात मिठाचा खडा पडतो आणि नात्यात दुरावा येतो. नकळत प्रेम कमी होतं आणि आपण आपल्या पार्टनरपासून दूर होतो. ज्यामुळे नातं संपुष्टात देखील येण्याची शक्यता असते.

आपण पार्टनरकडून भरपूर अपेक्षा ठेवतो. अपेक्षा पूर्ण न  झाल्यास आपला हिरमोड होतो. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर गोष्टींमुळे आपण पार्टनरला हवा तो वेळ देऊ शकत नाही. ज्यामुळे नात्यात फुट पडते. नात्यात दुरावा येऊ नये असे वाटत नसेल तर, आत्तापासून पार्टनरसोबत ४ गोष्टी करा. नातं पुन्हा नव्याने बहरेल(4 Ways to Rekindle the Spark in Your Relationship).

एकमेकांची काळजी घ्या

जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्या. काळजी घेणारा स्वभाव प्रत्येकाला आवडतो. ज्यामुळे मनात प्रेमाची भावना निर्माण होते. एकमेकांना समजून घेताना आपण आवडीनिवडी जाणून घेतो, काळजी घेतो. अशीच एकमेकांची काळजी आयुष्यभर घेत राहा.

गरीबी फार - खुराकही कमी पण अर्शद नदीम न चुकता खात असे २ गोष्टी, फिटनेस वाढला कारण..

शांतपणे ऐकून घ्यायला शिका

पार्टनर आपल्यासमोर काही शेअर करत असेल तर, त्यांचं नीट ऐकून घ्या. एकमेकांचं लक्षपूर्वक ऐकलं, ऐकून मग प्रतिसाद दिला तर नात्यात गैरसमज निर्माण होणार नाही. यामुळे रिलेशनशिप अधिक घट्ट होईल.

गिफ्ट्स देत राहा

आपला पार्टनर आपल्यासाठी खास आहे, हे पटवून देण्यासाठी छोटी का असेना भेटवस्तू देत राहा. या लहानशा कृतीतूनही नात्यात प्रेम कायम राहील. यामुळे पार्टनरला स्पेशल नक्कीच वाटेल.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

एकमेकांसाठी वेळ काढा

पार्टनर आपल्यालासाठी किती महत्वाचा आहे, हे त्यांना पटवून देण्यासाठी एकत्र वेळ घालवा. कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे पार्टनरसोबत वेळ घालवणं होत नाही. ज्यामुळे नात्यात प्रेम हरवून जातं. यासाठी एकत्र जेवायला बसा, वेळ घालवा, एकमेकांसोबत गप्पा मारा.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप