Join us  

पुरुषांनी कोणत्या कॉम्पलीमेंट दिलेल्या बायकांना आवडतात ? आणि कोणत्या गोष्टी ऐकून त्या चिडतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 10:16 PM

Survey decodes what kind of compliments women want on online dating platforms : कॉम्पलीमेंट देणं अनेकांना जमत नाही आणि कुणी दिल्या तर त्या स्वीकारताही येत नाहीत..

चारचौघात आपली कुणी प्रशंसा, थोडक्यात तारीफ केली तर कुणाला नाही आवडणार ? लोकांमध्ये आपली प्रशंसा होते आहे... लोक आपल्या बद्दल चांगले बोलत आहेत, आपण चांगल्या अर्थाने लोकांच्या चर्चेचा विषय आहोत... ही सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. स्त्रिया आणि कॉम्प्लिमेंट्स यांचे अतूट नाते असते. स्त्रियांना कायम कुणीतरी आपली तारीफ करावी, किंवा आपल्याला बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दयावे असे वाटत असते. आपण जर भारी दिसत असलो, किंवा छान नवीन ड्रेस घातला असेल, हटके फॅशन केली असेल तर आपल्याला कुणीतरी बेस्ट कॉम्प्लिमेंट द्यावी किंवा तारीफ करावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असतेच. स्त्री असो किंवा पुरुष सगळ्यांनाच आपली तारीफ केलेली आवडते. 

आजकालचा काळ हा डेंटिजिंग अँप्सचा जमाना आहे. या विविध प्रकारच्या डेटिंग अँप्सचा वापर करून आपण एकमेकांना डेट करु शकतो. याचबरोबर स्त्री - पुरुष या अँप्सवरून एकमेकांना ऑनलाईन डेटिंग करु शकतात. आता नुकताच बम्बल या एका डेटिंग अँपने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अर्ध्याहून अधिक म्हणजेच  (५६%) भारतीयांनी डेटिंग करताना शारीरिक गुणधर्मांपेक्षा  त्या व्यक्तीच्या मनातील दयाळूपणा व स्वभाव यांना मुख्य प्राधान्य दिले असल्याचे सिद्ध झाले आहे(44% of Indians confess they don’t know what makes a good compliment, finds Bumble survey).

बम्बल (Bumble) या डेटिंग अँपने केलेल्या सर्वेक्षणानुसार... 

बम्बल (Bumble) या डेटिंग अँपने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, ५६ % भारतीय आता एखादया व्यक्तीच्या शारीरिक गुणधर्मांपेक्षा तिच्यातील दयाळूपणाला किंवा स्वभावाला प्राधान्य देतात आणि  ८४ % उत्तरदात्यांचे असे म्हणणे आहे की, समोरच्या एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणे किंवा तिला कॉम्प्लिमेंट्स देणे ही एक चांगली गोष्ट आहे. बंबलच्या सर्वेक्षणात असेही आढळून आले की ५८ % प्रतिसादकर्त्यांना प्रशंसा मिळवणे फार कठीण वाटते, तर ६० % महिलांना असे वाटते की महिलांचे कौतुक करणे ही पुरुषांची जबाबदारी आहे. याचबरोबर, ८८% स्त्रियांना असे वाटते की, जेव्हा त्यांची प्रशंसा केली जाते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढतो. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ५५ % पुरुषांना स्त्रियांच्या शारीरिक वैशिष्ट्यांव्यतिरिक्त स्त्रीची प्रशंसा कशी करावी हेच माहित नाही, हे उघड झाले. 

वीकेंड मॅरेज? हा नेमका काय प्रकार आहे, जोडपी खरेच खुश असतात या नात्यात? तज्ज्ञ सांगतात...

जादू की झप्पी आयुष्यात हवीच, मायेने मारलेल्या मिठीचे फायदे ५, जगण्याला देतात नवा अर्थ...

स्त्रियांना कोणत्या प्रकारच्या प्रशंसा अधिक आवडतात... 

शारीरिक वैशिष्ट्यांपलीकडे जाऊन स्त्रियांना प्रमुख पाच प्रकारच्या प्रशंसा अधिक आवडतात. स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल,  मूल्ये आणि नैतिकता, विशिष्ट विषयाचे ज्ञान, विनोदबुद्धी आणि छंद किंवा एखाद्या विषयातील इंटरेस्ट या प्रकारातील कॉम्प्लिमेंट्स ऐकायला अधिक जास्त प्रमाणांत आवडतात. बम्बल (Bumble)च्या रिलेशनशिप एक्सपर्ट रुची रुह यांच्यामते, प्रशंसा करताना शारीरिक वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या गुणांची प्रशंसा करणे ही प्रशंसा करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. आपण आपल्या जोडीदाराची प्रशंसा कशासाठी करता याबद्दल अधिक विचार करणे आणि आदर करणे हेच प्रशंसा करताना लक्षात ठेवण्याचे मुख्य सूत्र आहे.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप