Join us  

ऑफिसमध्ये चुकूनही करु नका ५ गोष्टी, तरच प्रोफेशनल इमेजही राहील चांगली, करिअरलाही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 10:43 AM

5 Don’t of Body Language at Workplace for Good Image : ऑफीसमध्ये काही एटीकेटस आवर्जून पाळायला हवेत, तरच तुम्ही प्रोफेशनली चांगले आहात हे दिसते.

ऑफीस हे आपल्यापैकी अनेकांचे जवळपास दुसरे घरच असते. दिवसातला जवळपास ८ ते १० तास आपण याठिकाणी असतो. त्यामुळे याठिकाणी असणारे आपले सहकारी आपले चांगले मित्रमैत्रीणी कधी होतात आपल्यालाच कळत नाही. एकाच ऑफीसमध्ये आपल्याला साधारण १.५ ते २ वर्ष झाली असतील तर आपल्याला कंपनीचे सगळे नियमही चांगले माहिती होतात. सणवार किंवा काही खास दिवसही अनेकदा ऑफीसमध्ये उत्साहात साजरे केले जातात. यामुळे आपल्या याठिकाणच्या सहकाऱ्यांसोबत चांगले बाँडींग होते. असे सगळे असले तरीही ऑफीसमध्ये काही एटीकेटस आवर्जून पाळायला हवेत. यामुळे तुमचा प्रोफेशनॅलिझम तर दिसतोच पण तुमची इमेजही सहकाऱ्यांसमोर आणि वरिष्ठांसमोर चांगली राहण्यास मदत होते. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ऑफीसमध्ये वावरताना आवर्जून टाळायला हव्यात ते पाहूया (5 Don’t of Body Language at Workplace for Good Image)...

कधीच करु नका या ५ गोष्टी...  

(Image : Google)

१. अनेकदा आपण ऑफीसमध्ये आपल्याही नकळत खांद्यातून, कंबरेतून वाकून बसतो. यामुळे आपण आळसावलेले आहोत किंवा आपल्याला कामात रस नाही असे दिसते. त्यामुळे ऑफीसच्या खुर्चीत नीट टेकून आणि ताठ बसावे. यामुळे पाठीला त्रासही होत नाही आणि आपल्याला काम करण्यात रस आहे हे समजते. आपण आळसावलेले किंवा कंटाळलेले असलो तर आपल्या आजुबाजूला नकळत तसेच वातावरण तयार होते. 

२. कोणाशीही कामाबद्दल किंवा इतर काहीही बोलताना त्यांच्या अंगाला स्पर्श करणे शक्यतो टाळा. आपला चांगला मित्र किंवा मैत्रीण असेल तरीही ऑफीसमध्ये या गोष्टीसाठी आपण स्वत:ला एक मर्यादा घालून घ्यायला हवी.

३. कोणाच्याही कोणत्याही कारणाने खूप जवळ उभे राहणे टाळायला हवे. एखाद्याच्या वैयक्तिक क्षेत्रात आपण आक्रमण केले असे त्यांना वाटू शकते. त्यामुळे ते अस्वस्थ होऊ शकतात. त्यामुळे ऑफीसमध्ये कोणाशीही बोलताना ठराविक अंतर ठेवायला हवे. 

४. समोरचा व्यक्ती कामाबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याशी काही बोलत असेल तर त्यांना मध्ये तोडू नका. त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यावर तुम्ही बोला. कारण असे केल्याने ते काय म्हणतात ते ऐकण्यात तुम्हाला रस नाही असे त्यांना वाटू शकते. 

५. मिटींगमध्ये किंवा समोर कोणी बोलत असताना मोबाइल वापरणे शक्यतो टाळा. कारण समोरचा बोलत असताना तुम्ही मोबाइलवर असाल तर तुम्हाला त्याचा अनादर करत असल्याचे दर्शवते. तसेच तुम्ही समोरचा व्यक्ती सांगत असलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात असाही मेसेज यातून जाण्याची शक्यता असते. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप