दोघांचं एकमेकांवर प्रेम, नातं चांगलं मात्र वैवाहिक जीवनात लैंगिक सुख नाही. एकमेकांच्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा परस्परांना समजूनच घेता येत नाही असा अनुभव अनेकांचा असतो. (Tips For Happy Sex Life) न बोलून कुचंबणा होते पण लैंगिक नात्यातलं असमाधान मात्र कमी होत नाही. आणि मग दोघांपैकी एकाच्या इच्छेखातर वा रुटीन म्हणून सेक्सही उरकला जातो. (Foods That Increase Your Sexual Stamina)
त्यानं ना शरीराला सुख लाभतं, ना रिलॅक्स वाटतं ना आनंद मिळतो. काहींचा तर स्ट्रेस वाढतो. अनेकांना फार थकवा येतो, त्राण नाही अंगात असं वाटतं. या सगळ्यावर उपाय काय? (5 Food For Sex How to Enhance Sex) संवाद परस्परांशी हा उपाय तर आहेच पण आपल्या आहारात काही बदल केले तर, सेक्सनंतर किंवा सेक्स करण्याची इच्छाच नाही कारण शारीरिक थकवा यावर तोडगा सापडू शकतो.
लैंगिक विकारतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल यांनी मेन्स एक्सपी या वेबपोर्टलला दिलेल्या माहितीनुसार आहारात बदल केले तर अधिक सुखकर बदल जाणवू शकतात. स्ट्रॉबेरी, एवाकॅडो, टरबूज, बदाम यांचा आहारात समावेश करणं, अल्कोहोल न घेणं याचा उत्तम सेक्स लाइफशी थेट संबंध आहे. त्यामुळे ताकद वाढण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. (Common Foods That Help to Increase Your Sex Drive)
सुकामेवा आणि तेलबिया
बदाम, अक्रोड, काजू, शेंगदाणे, हेजलनट यांसारख्या पदार्थांत झिंक आणि एग्रीनिनचे प्रमाण जास्त असते. ड्रायफ्रुट्स शरीराला निरोगी ठेवतात कारण यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असतात. हे खाल्ल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. पुरूषांची प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते.
केस पातळ झाले-वाढतच नाहीत? 'या' २ गोष्टी केसांना कधीच लावू नका; जावेद हबीबचा सल्ला
डार्क चॉकलेट
मॅनमॅटरर्सच्या रिपोर्टनुसार डॉ. विणा शिंदे यांच्यामते डार्क चॉकलेटमध्ये एंटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. ६० टक्के कोकोपासून तयार झालेल्या डार्क चॉकलेट खावे. डार्क चॉकलेट सेक्ससाठी एक उत्तम कामोत्तेजक आहे. हे सेरोटोनिन आणि फेनिलेथिलाइनचे उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे लैंगिक आरोग्यही सुधारते.
फळं
भरपूर फळं खाल्ल्याने इरेक्टाईल डिसफंक्शचा धोका १४ टक्क्यांनी कमी होतो. याचं कारण फळांमध्ये असलेलं फ्लेवोनोइड असू शकते. जांभूळ, द्राक्ष, सफरचंद, आंबट फळं यात फ्लेवोनोईड्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे इरेक्शनमध्ये सुधारणा होते आणि लिबिडो वाढते. बिटात सुद्धा एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स आणि नायट्रेड असते ज्यामुळे ब्लड फ्लो आणि स्टॅमिना सुधारण्यास मदत होते.
सेक्स लाइफसाठी फोर प्ले का आवश्यक असतो? महिलांसाठी तो अधिक महत्त्वाचा ठरतो कारण..
कॉफी
एक कप कॉफीने तुम्हाला फ्रेश वाटू शकते. पण जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यास चिडचिड होऊ शकते. कॉफीमुळे डिहायड्रेश होऊ शकते. थकवा, तोंड कोरडे पडणं अशा समस्या उद्भवू शकतात म्हणून मर्यादीत प्रमाणात याचे सेवन करावे.
डाळींब
डाळिंबामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. तब्येत सुधारते. महिलाही शरीरात रक्त प्रवाह चांगला ठेवण्यासाठी डाळिंबाचे सेवन करू शकतात. ज्यामुळे सतत थकवा जाणवणार नाही.