Lokmat Sakhi >Relationship > नवरा-बायकोचं प्रेम आणि नात्यातला रोमांस कायम राहावा म्हणून बदला स्वतःच्या ५ सवयी

नवरा-बायकोचं प्रेम आणि नात्यातला रोमांस कायम राहावा म्हणून बदला स्वतःच्या ५ सवयी

5 habits to make your relationship long-lasting : जोडीदाराशी नाते चांगले असावे असं वाटत असले तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 11:07 AM2022-08-05T11:07:03+5:302022-08-05T14:08:51+5:30

5 habits to make your relationship long-lasting : जोडीदाराशी नाते चांगले असावे असं वाटत असले तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्या

5 habits to make your relationship long-lasting : Change your own 5 habits to keep your husband-wife love and romance in the relationship | नवरा-बायकोचं प्रेम आणि नात्यातला रोमांस कायम राहावा म्हणून बदला स्वतःच्या ५ सवयी

नवरा-बायकोचं प्रेम आणि नात्यातला रोमांस कायम राहावा म्हणून बदला स्वतःच्या ५ सवयी

Highlightsएकमेकांसोबत वेळ घालवणे असून माया, मैत्री आणि एकमेकाांची कदर करणे या गोष्टी जोडीदाराशी नाते भक्कम करण्याचा पाया आहेत. खासगीपणा आणि स्पेस हे आनंदी आणि दिर्घकाळ टिकतील अशा नात्यांचे गमक असू शकते. 

कोणतंही नातं टिकवायचं किंवा फुलवायचं तर त्या नात्यात प्रेम, आदर असायलाच हवा. नाते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न, त्याग आणि एकमेकांमध्ये विश्वास असावा लागतो. नातं बनवायला ते बहरायला कित्येक वर्ष जावी लागतात पण ते तोडायचं ठरवलं तर काही क्षणात तुटू शकतं. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, जोडीदाराशी आपले नाते चांगले असले तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चांगले नाते आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात, तर नाते घट्ट आणि चांगेल असेल तर तुम्ही नकळत आहात त्याहून चांगले व्यक्ती बनत जाता. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं घट्ट आणि चांगलं असेल तर त्याचा तुमच्या स्वत:च्या आणि मुलांच्या आयुष्यावर अतिशय चांगला परीणाम होतो असे मिता सिन्हा यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले (Relationship Tips). तुमचं नातं आनंदी आणि आरोग्यदायी असेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर फार मोठा परीणाम होत असल्याचं सिन्हा यांचं म्हणणं आहे. आता हे नातं दिर्घकाळ तसंच राहावं यासाठी काय करता येईल याविषयी (5 habits to make your relationship long-lasting)...

१. जोडीदाराचा ट्रीगर पॉईंट ओळखा 

तुमच्या जोडीदाराचा ट्रीगर पॉईंट तुम्हाला माहित असणे अतिशय आवश्यक आहे. एकमेकांची भांडणाची भाषा ओळखायला शिका. भांडणं सुरू असताना तुमच्या भावना अशाप्रकारे व्यक्त करा की समोरच्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचतील आणि मतभेद पोहोचणार नाहीत. भांडणे होतील तेव्हा तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून काय हवे ते लक्षात घ्या. यामध्ये एखादी मिठी, चॉकलेट, एखादी नोट असे काहीही असू शकते.

२. एकमेकांना माफ करायला शिका 

जे लोक एकमेकांवर प्रेम करतात ते एकमेकांना दुखावतातही. पण भांडणे झाल्यावर किंवा वाद-विवाद झाल्यावर एकमेकांना माफ करणे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. असे केल्यास तुमचे नाते अधिक चांगले होते आणि तुम्ही नात्यामध्ये कायम समाधानी राहता. समोरच्याला माफ केल्याने तुमचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टी मनात धरुन ठेवण्यापेक्षा एकत्र बसून गोष्टी सोडवणे अधिक महत्त्वाचे असते. 

३. जोडीदाराचे कौतुक करा

आपलं नातं जसं मुरत जातं तसं आपण जोडीदाराला गृहीत धरतो आणि त्याचे कौतुक करणे कमी होत जाते. पण त्याचे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व सतत आधोरेखित करत राहणे आवश्यक असते. समोरच्याला चांगल्या प्रतिक्रिया देणे आणि आपली चूक असेल तेव्हा माफी मागणे यात कोणताच कमीपणा नसतो. समोरच्याने तुमच्यासाठी केलेल्या लहानातल्या लहान गोष्टीचेही कौतुक करा, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खास असल्याचा आणि आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करत असल्याचा फिल येईल. तुम्ही समोरच्याला ती व्यक्ती स्पेशल आणि खास असल्याचा फिल दिलात तर तुमचा बॉन्ड अधिक घट्ट होण्यास मदत होईल. 

(Image : Google)
(Image : Google)

४. एकमेकांना पुरेशी स्पेस द्या

तुम्ही नात्यामध्ये एकमेकांना पुरेशी स्पेस दिली नाहीत तर नाते संकुचित होते. तुमच्या जोडीदाराला भावना व्यक्त करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. कारण तसे केल्याने तुमची भांडणाची शक्यता निश्चितच कमी होऊ शकते. एकमेकांना स्पेस दिल्याने भावनिक स्पष्टता येण्यास मदत होते तसेच समोरच्या व्यक्तीला स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ मिळतो. याचा समोरच्या व्यक्तीवर आणि आपल्या नातेसंबंधावर अतिशय सकारात्मक परीणाम होतो. त्यामुळे नियमितपणे स्वत:साठी थोडा वेळ काढा. खासगीपणा आणि स्पेस हे आनंदी आणि दिर्घकाळ टिकतील अशा नात्यांचे गमक असू शकते. 

५. नात्यातला रोमान्स कायम ठेवा 

आपलं नातं जसं जुनं होत जातं तसा त्यातील रोमान्स काही प्रमाणात कमी होत जातो. पण आपलं नातं दिर्घकाळ टिकणारं आणि मजबूत असेल तर आयुष्यात सतत एक्सायटींग काहीतरी घडायलाच हवे असे नाही. तर आपण आपल्या वागण्यातून ही एक्सायटमेटं आणि नात्यातील ओलावा टिकवून ठेवायला हवा. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा एकमेकांना भावनिक आधार द्या, वेळ मिळेत तेव्हा एकमेकांना चांगला वेळ द्या. एखादवेळी आपल्या पार्टनरसोबत एखादी चक्कर मारायला जाणे किंवा साधे आईस्क्रीम खायला जाणेही आपल्याला सुखावून टाकणारे ठरु शकते. सगळ्यात महत्त्वाचे एकमेकांसोबत वेळ घालवणे असून माया, मैत्री आणि एकमेकाांची कदर करणे या गोष्टी जोडीदाराशी नाते भक्कम करण्याचा पाया आहेत.  
 

Web Title: 5 habits to make your relationship long-lasting : Change your own 5 habits to keep your husband-wife love and romance in the relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.