पुरुषांचे जीवन जितके सोपे मानले जाते, प्रत्यक्षात त्यांचे जीवन तितके सोपे नसते. त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि वैयक्तिक जीवनात अनेक पदर आहेत ज्यात त्याच्या भावना आणि इच्छा दडल्या आहेत.(Relationship Tips) पुरुष देखील काही वेळा रहस्यमय असू शकतात आणि अनेक गोष्टी लपवून ठेवू शकतात. आज आम्ही तुमच्यासाठी पुरूषांच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि आयुष्याशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. (What are some things men never tell women)
1) पुरूषांनाही आधाराची गरज असते
प्रत्येकाला आपल्या प्रियजनांकडून भावनिक आधाराची गरज असते. जरी पुरुष ही गरज स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. पण त्यांनाही अशी इच्छा असते की कोणीतरी त्यांच्यावर प्रेम करावे, कोणीतरी त्यांना नेहमी चांगल्या-वाईट काळात साथ द्यावी आणि कोणीतरी त्यांना तणावातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी.
२) मनातल्या गोष्टी मनातच ठेवणं
हा एक मोठा गैरसमज आहे तो म्हणजे पुरुषांनी त्यांची भीती, दुःख किंवा कमजोरी इतरांसमोर उघड करू नये, त्यांनी सर्वांसमोर रडू नये. यामुळे ते कमकुवत किंवा कमी कठोर दिसतात. अशा चुकीच्या विचारसरणीमुळे त्यांना त्यांची भीती उघडपणे व्यक्त करता येत नाही. ही भीती एखाद्याला गमावण्याची, अपयशाची किंवा इतर कशाचीही असू शकते. त्याला अस्वस्थ पाहिल्यानंतर एक पार्टनर म्हणून, कोणताही चुकीचा निर्णय न घेता त्याच्याशी मोकळेपणानं बोलणं, समजून घेणे महत्वाचे आहे.
३) नजरेचा खेळ
बहुतेक पुरुष त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे एक नजर टाकतात. ते स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचे निरिक्षण करतात आणि कधीकधी त्यांना आवडत असल्यास त्यांच्याशी बोलू इच्छितात. ही त्यांची स्वाभाविकच सवय आहे. मात्र, जेव्हा ते त्यांच्या जोडीदारासोबत असतात तेव्हा ते इतर महिलांकडे लक्ष देण्याचे टाळतात. कारण आपला पार्टनर कुठे, कोणाकडे पाहतोय याकडे आधीच महिलांचं लक्ष गेललं असतं.
४) लहान मोठ्या गोष्टींवर लक्ष देत नाही
पुरुष महिलांच्या तुलनेत लहान मोठ्या समस्यांकडे कमी लक्ष देतात. नात्यात होणाऱ्या किरकोळ समस्यांकडे ते फारसे लक्ष देत नाहीत आणि निष्काळजी राहतात. कधी हीच वृत्ती त्यांच्या नात्यात आनंदी ठेवते तर कधी हाच बेफिकीरपणा मोठ्या भांडणाचे कारण बनतो. वेळेत फोन का केला नाही किंवा उचचला का नाही अशा शुल्लक कारणांवरून अनेकदा जोडप्यांमध्ये वाद होतात.
५) एक्सची आठवण आली तर पार्टनरला सांगत नाही
बायकोच्या एखाद्या कृतीमुळे दुखावलं गेल्यानं किंवा कमीपणा जाणवल्यास लगेच एक्सची आठवण येते. पण काहीही झालं तरी मुलं ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगत नाहीत. कारण एक्सचा विषय काढताच दोघांमध्येही वाद होण्याची शक्यता असते.