Join us  

प्रेम आहे पण एकमेकांसाठी वेळच नाही? नात्यात पुन्हा रोमान्स येण्यासाठी पाहा ७-७-७ चा नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 5:31 PM

Relationship Tips:नात्यामध्ये दुरावा आला असेल तर हा ७-७-७ चा नियम एकदा फॉलो करून तर बघा...(what is 7-7-7 rule for romantic relationship)

ठळक मुद्देअसं तुमचंही झालं असेल तर एकदा ७-७-७ च्या नियमाचं पालन करून पाहा...

बऱ्याचदा असं होतं की नात्यामध्ये प्रेम तर असतं. पण तरीही कधी कधी एकमेकांना वेळ देणं होत नाही. एकमेकांशी बोलणंही होत नाही. हळूहळू मग नात्यामध्ये दुरावा येऊ लागला आहे की काय असं वाटतं. काही जोडपी अशीही असतात की त्यांच्यामध्येही एकमेकांविषयी खूप प्रेम असतं. पण तरीही ते भेटले की इतर काही ताणतणावांमुळे एकमेकांवर नुसतीच चिडचीड करतात. आपल्या जोडीदारावर सगळा राग, ताण काढतात. असं वारंवार झालं की आपलं नातं आता पुर्वीसारखं रोमॅण्टिक राहिलेलं नाही, असं दोघांनाही वाटू लागतं (how to make your relation more mature and romantic). असं तुमचंही झालं असेल तर एकदा ७-७-७ च्या नियमाचं पालन करून पाहा...(7-7-7 rule for romantic relationship)

काय आहे नात्याला रोमॅण्टिक वळण देणारा ७-७-७ चा नियम?

 

कोणतंही नातं दृढ करायचं असेल तर एकमेकांना वेळ देणं, समजून घेणं गरजेचं असतं. पण हल्ली वेळेचाच सगळा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समजून घ्यायला, मन मोकळं करायला वेळच नाहीये. इथूनच तर नात्यात गुंता व्हायला, नातं ताणलं जायला सुरुवात होते.

भरजरी कपड्यांना घरीच इस्त्री कशी करावी? ३ स्मार्ट ट्रिक्स- काम झटपट होऊन पैसेही वाचतील 

आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणूनच तर ७-७-७ चा नियम आहे. या नियमातले पहिले ७ तुम्हाला असं सांगतात की दर सात दिवसातून एकमेकांसाठी थोडा वेळ काढा. रविवारच्या सुटीच्या दिवसाचा सकाळचा किंवा संध्याकाळचा एक तास तर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी नक्कीच काढू शकता...

 

या नियमातले दुसरे ७ हे सांगतात की दर ७ आठवड्यांनी तुमच्या पार्टनरला घेऊन डेटवर जा. किंवा लाँगड्राईव्ह, डिनर असं काही प्लॅन करा. यामुळे एकमेकांना थोडं निवांतपणे नक्कीच भेटता येईल. तर शेवटचे ७ असं सांगतात की दर ७ महिन्यांनी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत व्हॅकेशनला जा.

मुलांचं पाठांतर होत नाही- वाचलेलं लगेच विसरून जातात? ३ गोष्टी करा, धाडधाड उत्तरं देतील

यामुळे तुमचा संवाद वाढेल. बाहेर जाऊन आलात की थोडं फ्रेश व्हाल आणि नव्याने सगळ्या गोष्टींची सुरुवात करू शकाल. हा नियम पाळताना एवढं एकच लक्षात ठेवा की जो काही वेळ तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी मिळेल तो मोबाईल पाहण्यात, चिडचिड करण्यात, एकमेकांशी उणीदुणी काढण्यात घालवू नका. नाहीतर यामुळे नातं आणखीनच बिघडायला वेळ लागणार नाही. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप