बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थ (Siddharth) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. दोघांनी वानपर्थीच्या ४०० वर्ष जुन्या श्रीरंगपूर मंदिरात लग्न केले, त्यांच्या लग्नाचा पारंपरिक लूक, त्यांचे भरजरी आऊटफिट्स, लग्नाचे अचानक शेअर केलेले फोटो या सगळ्या अचानकपणे झालेल्या गोष्टींमुळे नेटकऱ्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाची चर्चा खास रंगताना दिसत आहे. या कपलने अजून एका खास कारणांमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे या दोघांच्या नात्यातील हेल्दी रिलेशनशिपचे खास गुपित(Siddharth revealed that 90% of the time, his conversation with his now wife is only saying sorry).
या नवविवाहित जोडप्याची एक मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांच्या नात्याबाबत अनेक खुलासे (Siddharth Reveals His Love Language For Wife, Aditi Rao Hydari, Admits 'I Do So Many Things Wrong.) करण्यात आले आहेत. खरंतर, आपण रोजच काही ना काही छोट्या - मोठ्या कारणांमुळे आपल्या पार्टनरला सॉरी, थँक्स म्हणत असतो. परंतु नात्यात सॉरी आणि थँक्स नेमके केव्हा, कधी आणि कसे बोलावे याबद्दल आदिती आणि सिद्धार्थने एक खास सिक्रेट शेअर केले आहे(Siddharth reveals his conversation with Aditi Rao Hydari: 90% of 'Sorry' and 10% of 'Thank you').
फॉलो करा ९० % सॉरी आणि १० % थँक्स...
वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आदिती आणि सिद्धार्थने त्यांच्या नात्यातील अनेक गुपिते उघड केली. सिद्धार्थने सांगितले की, ९० % वेळा तो आदितीला सॉरी म्हणतो आणि १० % वेळा तो थँक्यू देखील म्हणतो. सिद्धार्थच्या या उत्तरावर आदिती खूप हसली. त्यांच्या सॉरी आणि थँक्सच्या या अजब लॉजिक्सने त्यांच्या आनंदी नात्याचा खुलासा त्यांनी केला.
नात्यात सॉरी आणि थँक्स दोन्ही का महत्वाचे आहे ?
सुखी वैवाहिक जीवनासाठी सॉरी आणि थँक्स या दोघांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. मॅरीड लाईफमध्ये किंवा कोणत्याही नात्यात सॉरी आणि थँक्स हे दोन्ही खूप महत्वाचे असतात. सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या नात्यात सॉरीची बोलण्याची संख्या जास्त आहे, याचा थेट अर्थ असा आहे की, भांडण वाढू नये किंवा काही मोठे वादविवाद होऊ नये म्हणून तो लहान चुकांवरही सॉरी म्हणतो. याउलट, जेव्हा काही चांगले घडते तेव्हा तो तिचे आभार देखील मानतो.
कपल्स थेरपी म्हणजे काय? लग्नानंतर दोनच दिवसांनी फरहान अख्तरने घेतली या थेरपीची मदत कारण...
रिलेशनशिपमध्ये सॉरी म्हणणे कधी आवश्यक आहे...
पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असले तरी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडणे होतच असतात यात शंका नाही. रिलेशनशिपमध्ये जेव्हा दोघे भांडतात तेव्हा ते आपली बाजू एकमेकांपुढे मांडत असतात, आणि आपली बाजू मांडताना भांडण होणे हे सहाजिकच आहे. असे असले तरी समजूतदार जोडपं तेच आहे जे आपली चूक मान्य करून फक्त भांडण संपवण्यापुरतंच नाही तर अगदी मनापासून एकमेकांना सॉरी म्हणते. खरे तर चूक लक्षात येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही वेळीच छोट्या-छोट्या चुका मान्य करून सॉरी बोलून भांडण संपवता तेव्हा या गोष्टी मोठ्या भांडणाचे कारण बनत नाहीत.
थँक्स म्हटल्याने नात्यात येतो गोडवा...
एक साधासुधा फक्त दोन अक्षरी शब्द थँक्स म्हटल्याने तुमच्या नातेसंबंधावर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात. जेव्हा कोणी तुमचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे प्रेमाने आभार मानणे ही तुमची जबाबदारी आहे. जेणेकरून समोरच्याला वाटेल की त्याने तुमच्यासाठी जे काही केले ते तुम्हाला चांगले वाटले. अशाप्रकारे, नाती निरोगी ठेवण्यासाठी थँक्स बोलणे खूप महत्वाचे आहे.