Join us  

पाहा मायलेकीचं नातं! ‘माझी आई म्हणजे…’ आईला शुभेच्छा देत आराध्या बच्चन म्हणाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 4:25 PM

Aaradhya Bacchan first Speech about mom Aishwarya rai Bacchan on her Birthday : आईच्या वाढदिवसानिमित्ताने पहिल्यांदाच आराध्या व्यक्त झाली आणि तिने ऐश्वर्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि विश्वसुंदरी असलेली ऐश्वर्या रॉय बच्चन नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीतून काहीशी दूर गेली असली तरी तिच्या सौंदर्यावर आजही चाहते तितकेच फिदा आहेत. ९० च्या दशकात अनेकांच्या दिल की धडकन असलेल्या ऐश्वर्याचे अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्न झाले आणि ती चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूर गेली. या दोघांना मुलगी झाल्यानंतर तर ऐश्वर्या फक्त तिच्या मुलीसोबत आणि फॅमिलीसोबतच दिसायला लागली. आराध्याच्या बाबतीत अतिशय प्रोटेक्टीव्ह असलेल्या ऐश्वर्याचे आपल्या सगळ्यांनाच विविध माध्यमातून अनेकदा दर्शन होते (Aaradhya Bacchan first Speech about mom Aishwarya rai Bacchan on her Birthday) . 

कोणताही  कार्यक्रम असो किंवा एअरपोर्टवर ऐश्वर्याला स्पॉट केलेले असो. प्रत्येक फोटोत ती आराध्याचा हात धरलेलीच पाहायला मिळते. मात्र या माय-लेकीचे नाते काहीतरी खास आहे हे नक्की. या दोघी माय-लेकींमधील बाँड अतिशय स्पेशल असल्याचेही आपल्याला पाहायला मिळते. नुकताच याचा प्रत्यय आला असून ऐश्वर्याच्या नुकत्याच झालेल्या ५० व्या वाढदिवसाला आराध्याने पहिल्यांदाच आपल्या आईबद्दलच्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत. इतके दिवस केवळ आईचा हात धरुन दिसणारी आराध्या आता मोठी झाली असून तिची उंचीही जवळपास ऐश्वर्याच्या उंचीइतकी झाली आहे. टिन एजमध्ये असणारी आराध्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने पहिल्यांदाच व्यक्त झाली आणि तिने ऐश्वर्याबद्दलच्या आपल्या मनात असणाऱ्या भावना बोलून दाखवल्या.

आराध्या म्हणाली, "  माझी प्रिय आई,  माझे सर्वस्व आहे, ती जे काही करते आहे ते खरंच खूप महत्त्वाचं आणि अतिशय उत्तम आहे. तिच्या कामातून ती संपूर्ण जगाची मदत करते आहे.  अशाप्रकारे तू जे काही करत आहेस ते अविश्वसनीय आणि खूप महत्त्वाचे आहे. " आराध्या आपल्याबद्दल पहिल्यांदाच सोशली असे काही बोलली म्हणून ऐश्वर्याला खूप आश्चर्य वाटत होते. तर आपले इतके कौतुक होत आहे हे पाहून ऐश्वर्या आराध्याच्या हातातून माईक ओढून घेत होती. यावेळी ऐश्वर्या, आराध्या आणि ऐश्वर्याची आई सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे दिसले. पण बच्चन परीवार त्यांच्यासोबत नसल्याने त्यावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

टॅग्स :रिलेशनशिपऐश्वर्या राय बच्चन