Lokmat Sakhi >Relationship > .. त्याहून मोलाचं काहीच नाही!- अभिषेक बच्चन सांगतोय, त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यातली महत्त्वाची गोष्ट!

.. त्याहून मोलाचं काहीच नाही!- अभिषेक बच्चन सांगतोय, त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यातली महत्त्वाची गोष्ट!

प्रत्येक वेळेस भेटीसाठी महागामोलाचं गिफ्टच महत्त्वाच असं नाही. केवळ एकमेकांची उपस्थिती, एकमेकांजवळ असणं हे नवरा बायकोच्या नात्याला घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबातल्या आंनदाला द्विगुणित करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. अमिताभ बच्चन यांनी सांगितली अभिषेक बच्चनच्या एका सरप्राइजची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 02:49 PM2021-10-27T14:49:48+5:302021-10-27T15:00:17+5:30

प्रत्येक वेळेस भेटीसाठी महागामोलाचं गिफ्टच महत्त्वाच असं नाही. केवळ एकमेकांची उपस्थिती, एकमेकांजवळ असणं हे नवरा बायकोच्या नात्याला घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबातल्या आंनदाला द्विगुणित करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. अमिताभ बच्चन यांनी सांगितली अभिषेक बच्चनच्या एका सरप्राइजची गोष्ट.

Abhishek Bachhan speak about love for Aishwarya. ..There is nothing more valuable than happiness in relation! | .. त्याहून मोलाचं काहीच नाही!- अभिषेक बच्चन सांगतोय, त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यातली महत्त्वाची गोष्ट!

.. त्याहून मोलाचं काहीच नाही!- अभिषेक बच्चन सांगतोय, त्याच्या आणि ऐश्वर्याच्या नात्यातली महत्त्वाची गोष्ट!

Highlightsबायको आपल्यासाठी जे करते ते आपणही तिच्यासाठी करावं ही भावना मनात ठेवूनच अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला एक सरप्राइज गिफ्ट दिलं.अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही नात्यातला आणि कुटुंबातला आनंद जपण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांच्या सोबतीनं मिळालेला आनंद पैशानं किंवा कोणत्याही भौतिक सुखानं मिळणार नाही असं ऐश्वर्याचं ठाम मत आहे.

बॉलिवूड जगातले रिअल टइम नवरा बायको एकमेकांना कारणानिमित्त किंवा कारणाशिवाय ज्या महागड्या वस्तू भेट म्हणून देतात त्याची चर्चा नेहेमी होत असते. सध्या करवा चौथच्या निमित्ताने अभिषेक बच्चन यांनी बायको ऐश्वर्या रायला दिलेल्या एका अमूल्य भेटीची चर्चा होते आहे. हे वाचून मनात लाखो करोडोंच्या किंमतीच्या गिफ्टची अटकळ लावून बसले असाल तर ते अगदीच चूक आहे. कारण ऐश्वर्याने अभिषेकने करवा चौथला तिला दिलेल्या भेटीच मोल पैशात करता येणं अवघड असल्याचं म्हटलं आहे. हे वाचल्यानंतर असं कोणतं गिफ्ट अभिषेकने ऐश्वर्याला दिलं असेल याबाबत आणखी उत्सुकता वाढते.

स्वत: अमिताभ बच्चन यांनी करवा चौथच्या दिवशी घरात घडलेला किस्सा सांगितला. अमिताभ आपल्या समाज माध्यमावरील पोस्टमधे म्हणतात की , संध्याकाळी अभिषेकने ऐश्वर्याला एक सरप्राइज देऊन एकदम खुश करुन टाकलं. त्याच्या या सरप्राइज गिफ्टनं केवळ ऐश्वर्याच नाही तर आख्खं कुटुंब आनंदित झालं असल्याचं अमिताभ यांनी म्हटलं आहे.

Image: Google

अमिताभ आपल्या पोस्टमधे एखादी गोष्ट सांगावी तसा हा किस्सा वर्णन करतात. अमिताभ लिहितात करवा चौथच्या  दिवशी संध्याकाळी पुजेची लगबग सुरुच होती आणि शुटींगसाठी बाहेरगावी गेलेला अभिषेक कोणाला काहीही न कळवता आमच्यामोर उभा राहिला. ‘ब्रीथ’ या वेबसीरिजच्या पुढच्या सिझनच्या शुटिंगसाठी अभिषेक घरे नव्हता. अमिताभ म्हणतात अशा महत्वाच्या प्रसंगी नवरा बाहेरगावी असला की बायकोचं निराश होणं स्वाभाविक आहे. पण अभिषेकने ऐश्वर्या नाराज होवू नये म्हणून शुटिंगमधे छोटासा ब्रेक घेऊन घरी येण्याला प्राधान्य दिलं. आपल्या मुलानं बायकोप्रती दाखवलेलं प्रेम बघून अमिताभ यांनाही समाधान वाटलं. कामानिमित्तानं बाहेरगावी जाणं, खूप दिवस घरापासून लांब राहाणं ही काळाची गरज आहे. पण अमिताभ म्हणतात प्रसंगातलं गांभिर्य ओळखून अभिषेकने घेतलेल्या निर्णायाचं कौतुक खूप आहे. अशा प्रकारच्या सरप्राइजेसची इच्छा जगातील कोणत्याही बायकोला आपल्या नवर्‍याकडून असते. प्रत्येक वेळेस भेटीसाठी महागामोलाचं गिफ्टच महत्त्वाच असं नाही. केवळ एकमेकांची उपस्थिती, एकमेकांजवळ असणं हे नवरा बायकोच्या नात्याला घट्ट करण्यासाठी आणि कुटुंबातल्या आंनदाला द्विगुणित करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, असं अमिताभ यानिमित्तानं सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

Image: Google

बायको आपल्यासाठी जे करते ते आपणही तिच्यासाठी करावं या भावनेनं अभिषेकही ऐश्वर्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवतो. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दलच्या फारशा बातम्या प्रसारमाध्यमात येत नाही. पण दोघंही नातं घट्ट करण्यासाठी एकमेकांना वेळ देण्याचा नियम काटेकोरपणे पाळतात. कोरोना, लॉकडाऊन आणि त्यानिमित्तानं मिळालेली मोठी सुटी यामुळे तुमच्या आयुष्यात काय घडलं असा प्रश्न काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याला विचारण्यात आला होता, तेव्हा तिने दिलेलं उत्तर सर्वसामान्य जोडप्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. ऐश्वर्या म्हणते की लॉकडाउनमुळे पहिल्यांदा इतका वेळ एकमेकांसोबत घालवण्याची संधी आम्हाला मिळाली. यातला प्रत्येक क्षण आम्ही एकमेकांना आणि कुटुंबाला दिला. एकमेकांच्या सोबतीनं मिळालेला हा आनंद पैशानं किंवा कोणत्याही भौतिक सुखानं मिळणार नाही याची जाणीव या लॉकडाऊनने आमच्यासोबत प्रत्येकालाच दिली. कुटुंबांचं प्रेम, कुटुंबाची सोबत आणि आनंद यापेक्षा जगात दुसरं काहीही मोठं आणि महत्त्वाचं नाही, नसतं असं ऐश्वर्यानं उत्तरादाखल सांगितलं.

Image: Google

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नवरा बायको म्हणून एकमेकांप्रतीच्या या भावना आणि अनुभव कितीही वैयक्तिक असले तरी प्रसिध्द व्यक्तींचे हे अनुभव सामान्य माणसांनाही काही शिकवून जातातच. अभिषेक आणि ऐश्वर्यानं यानिमित्तानं कौटुंबिक आनंदाला दिलेलं महत्त्वं प्रत्येकाला आपल्या कुटुंबाप्रतीच्या प्रेमाबद्दल नवी नजर देणारंच आहे.

Web Title: Abhishek Bachhan speak about love for Aishwarya. ..There is nothing more valuable than happiness in relation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.