Lokmat Sakhi >Relationship > सैफ उत्तम स्वयंपाक आनंदानं करतो, मी तिकडे फिरकत नाही! करिना कपूर सांगतेय, स्वयंपाकाची बदलती गोष्ट

सैफ उत्तम स्वयंपाक आनंदानं करतो, मी तिकडे फिरकत नाही! करिना कपूर सांगतेय, स्वयंपाकाची बदलती गोष्ट

Actress Kareena Kapoor Praises Saif Ali Khan For His Cooking: दोघं सुपरस्टार, एकाला स्वयंपाक आवडतो-करता येतो. दुसऱ्याला नाही, इतकं सोपं करुन घर चालवणाऱ्या सैफ-करिनाच्या संसाराची आनंदी गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 05:14 PM2023-08-22T17:14:35+5:302023-08-22T17:16:34+5:30

Actress Kareena Kapoor Praises Saif Ali Khan For His Cooking: दोघं सुपरस्टार, एकाला स्वयंपाक आवडतो-करता येतो. दुसऱ्याला नाही, इतकं सोपं करुन घर चालवणाऱ्या सैफ-करिनाच्या संसाराची आनंदी गोष्ट...

Actress Kareena Kapoor says husband Saif Ali Khan is an amazing cook..and reveals many secrets about their life | सैफ उत्तम स्वयंपाक आनंदानं करतो, मी तिकडे फिरकत नाही! करिना कपूर सांगतेय, स्वयंपाकाची बदलती गोष्ट

सैफ उत्तम स्वयंपाक आनंदानं करतो, मी तिकडे फिरकत नाही! करिना कपूर सांगतेय, स्वयंपाकाची बदलती गोष्ट

Highlightsआम्ही दोघंही 'होमबर्ड्स' आहोत. कुठे बाहेर रेस्टॉरंट्समध्ये जाण्यापेक्षा आमच्या मित्रमंडळींना घरीच बोलवणे आम्हाला जास्त आवडते, असंही तिने आवर्जून सांगितलं.

करिना कपूर आणि सैफ अली खान (Kareena Kapoor- Saif Ali Khan) हे बॉलीवूडमधलं एक लक्षवेधी जोडपं. एकमेकांसोबत आणि एकमेकांबद्दल बोलताना ते नेहमीच अगदी खूश आणि आनंदी दिसून येतात. याचा आणखी एकदा प्रत्यय नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीतून सुद्धा आला. करिना कपूर एका कार्यक्रमानिमित्त दिल्लीला गेली होती. तिथे तिची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान तिने नवरा सैफ अली यान याच्या पाककौशल्याबद्दल तसेच त्या दोघांच्या आवडी- निवडीबाबत, मुलांबद्दल आणि एकूणच त्यांच्या संसाराबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. (Saif Ali Khan is an amazing cook)

 

या मुलाखतीदरम्यान बोलताना करिना म्हणाली की आम्ही दोघंही सहसा विकेंडला घरीच राहण्याचा प्रयत्न करतो. त्यादिवशी काम करायला आम्हाला आवडत नाही. एकत्र बसून आम्ही वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ बघतो.

तिखटाला जाळं लागून वर्षभराचं तिखट भुरकट- खराब होतं? करा फक्त २ गोष्टी, तिखट वर्षभर राहील लालेलाल

पण ते करण्याचा प्रयत्न मात्र सैफच करतो. त्याला जवळपास सगळेच पदार्थ करता येतात. पास्ता, पिझ्झासारखे इटालियन पदार्थही तो खूप छान करतो. मी मात्र पुर्णपणे 'स्विगी आणि झोमॅटो पर्सन' आहे.. मला धड पाणीही उकळता येत नाही. आम्ही दोघंही 'होमबर्ड्स' आहोत. कुठे बाहेर रेस्टॉरंट्समध्ये जाण्यापेक्षा आमच्या मित्रमंडळींना घरीच बोलवणे आम्हाला जास्त आवडते, असंही तिने आवर्जून सांगितलं.

 

सैफ अली खानच्या स्वयंपाकाबद्दल झाल्यानंतर मुलांविषयी बोलताना करिना म्हणाली की मुलांसोबत वेळ घालवणे, गेम खेळणे, जेवण बनवणे, उनो खेळणे असं काहीसं आमचं विकेंडला सुरू असतं.

तुम्हीही बाक काढून चालता- बसता? ४ व्यायाम १० मिनिटं करा, बिघडलेलं बॉडी पोश्चर सुधारेल- पाठदुखीही थांबेल

हल्ली तैमूर नेहमी मित्रांसोबत राहण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा आग्रह करतो. यावरूनच असं दिसतं की तो आता मोठा होत चालला आहे. अभिनेत्री म्हणून करिनाला नेहमीच आपण पाहतो. पण एक बायको आणि आई म्हणून तिने सांगितलेल्या या गुजगोष्टी तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडल्या असणार. 

 

Web Title: Actress Kareena Kapoor says husband Saif Ali Khan is an amazing cook..and reveals many secrets about their life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.