पार्टनर (Partner) कसा असावा? पार्टनरबाबत तुमच्या काय अपेक्षा आहेत? असं लग्नाचं वय झाल्यानंतर विचारलं जातं (Relationship Tips). आपण आपल्या पार्टनरकडून विशेष अपेक्षा ठेवतो (Partner). अलीकडेच अभिनेता आदित्य रॉय कपूरनेही त्याच्या पार्टनरमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्या, याबद्दल माहिती शेअर केली आहे (Aditya Roy Kapoor). याआधी तो अभिनेत्री अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या बातम्या समाज माध्यमांत चर्चेत होत्या. पण तो सध्या सिंगल आणि चिल मोडवर आहे.
अलीकडेच करीना कपूर खानच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' सीझन ५ या पाॅडकास्टमध्ये तो याविषयी मोकळेपणानं बोलला. आदित्य कपूरने हजेरी लावली. यादरम्यान, त्याने पार्टनरकडून असलेल्या अपेक्षा आणि स्वप्न सुंदरी कशी असावी? याबद्दलची माहिती दिली आहे(Aditya Roy Kapur REVEALS his most desirable traits in a woman; says, ‘Being honest...').
सेन्स ऑफ ह्युमर
पॉडकास्ट शोमध्ये आदित्यने आपल्याप्रती कोणत्या अपेक्षा आहेत, याची माहिती दिली. मुलीमध्ये सेन्स ऑफ ह्युमर असावा. काही सेकंदात कोणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य आणण्याची क्षमता असावी. विनम्र आणि हुशार मुलीकडे बरेच लोक लवकर आकर्षित होतात.
वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे..
स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष
मुलगी प्रामाणिक आणि शब्द पाळणारी असावी. असं आदित्यचं मत आहे. ज्या मुली स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष देतात. ज्यांना काहीतरी आयुष्यात करायचं आहे. त्या मुली फार चांगल्या असतात. सतत चिडचिड, आणि रडत बसणाऱ्या मुली कोणालाही आवडत नाहीत.
स्वतःची कदर
स्वतःची कदर आणि मनातल्या गोष्टी शेअर करणाऱ्या मुली आदित्यला आवडतात. स्वतःची वॅल्ह्यू करणाऱ्या मुली स्वतःचा आदर ठेवतात. जे योग्य आहे. ज्या मुली अयोग्य गोष्टी घडत असताना शांत बसतात, बोलत नाहीत, त्या मुली पुढे जाऊन झुरत बसतात. स्वतःची कदर करायला शिकायला हवं.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
निष्ठावंत
मुली निष्ठावंत असायला हवी. रिलेशनशिपमध्ये विश्वास असल्यावरच, नाते पुढे जाते. विश्वासू मुलींसोबत संसार थाटण्यास मुलांना आवडते. शिवाय कुटुंबातील लोकांचे आदर ठेवणारी मुलगी प्रत्येक मुलाला आवडते.