बॉलीवूडमधील मोठमोठाल्या सेलिब्रिटी जोडप्यांची जशी चर्चा होत असते, तशीच चर्चा अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन (Ankita Lokhande and Vicky Jain) यांचीही होत असते. दोघांचे वेगवेगळे फोटोशूट्स, वेगवेगळ्या सणांचं सेलिब्रेशन, रिॲलिटी शोमधला त्यांचा सहभाग, त्यांनी घेतलेलं नवं घर या सगळ्या गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्याबाबतची चर्चा रंगात आली आहे. ती म्हणजे लग्नानंतर तब्बल एका वर्षानी म्हणजेच लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते दोघे हनिमूनला (honeymoon) गेले आहेत.
हनिमूनसाठी एवढा उशीर का?हल्ली लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेचच हनिमूनच्या तारखाही निश्चित केल्या जातात आणि ठिकाणेही ठरवली जातात. त्यामुळे अंकिता आणि विकी यांनी एवढा का उशीर केला, असा प्रश्न त्यांना विचारला जाणं साहजिक आहे.
ख्रिसमस सुटीत घरी आल्यावर मुलांनी काय- काय करायचं, आईने केलं जबरदस्त प्लॅनिंग, बघा टाईमटेबल
याविषयी एचटी एन्टरटेनमेंट यांनी प्रसिद्ध केलेल्या एका मुलाखतीनुसार अंकिता असं म्हणाली की लग्नानंतर ते दोघेही खूप वेगवेगळ्या कामांमध्ये अडकलेले होते. त्यामुळे एकमेकांसोबत बाहेर जाण्यासाठी त्यांच्याकडे निवांत वेळच नव्हता. त्यामुळे आता थोडा वेळ असल्याने ते युरोपमध्ये फिरायला जात आहेत. या हनिमूनबाबत अंकिता प्रचंड उत्साही असून ती म्हणाली की मला तर माझ्या दोन्ही हातावर मेहंदीही काढायची होती. पण तिथे जाऊन थंडीत ग्लोव्ह्जच घालावे लागणार, म्हणून मग मेहेंदीचा प्लॅन कॅन्सल केला.
अंकिताच्या या गोष्टींवर विकी फिदा..अंकिताला प्रत्येक सण आणि आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठा प्रसंग नातलगांना, मित्रमंडळींना घरी बोलावून सेलिब्रेट करायला आवडतं. मला ही सवय तिच्यामुळेच लागली.
कोणत्या प्रकारच्या साडीवर कुठलं ब्लाऊज शोभून दिसतं? ब्लाऊजचे ४ प्रकार, निवडा परफेक्ट स्टाइल
तिच्या या गोष्टीमुळे खरोखरच खूप उत्साह वाटतो, आनंद वाढतो. अंकिता म्हणाली माझं लग्नही मी खूप मनापासून एन्जॉय केलं. लग्नात मी मुळीच रडले नाही कारण मी खूप एक्सायटेड होते. नात्यातला हाच आनंद कायम ठेवण्यासाठी आणि नातं पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी दर ३ वर्षांनी पुन्हा- पुन्हा लग्न करून ते एन्जॉय करण्याचा आमचा विचार आहे.