Join us  

आणखी शिकण्यासाठी मुलीचं लग्नाचं वय २१ करा; १५० मुलींचं पंतप्रधान मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 3:47 PM

Age of marriage girl 21: याआधीही मुलीचं लग्नाचं वय २१ असावं याबाबत चर्चा सुरू होत्या.

ठळक मुद्देजे लोक उशीरा लग्न करतात ते आर्थिकदृष्ट्या बळकट असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या नात्यात पैशाची कमतरता भासत नाही.

अधिक शिक्षण घेण्यासाठी मुलींचे लग्नाचं वय २१ करावं यासाठी हरियाणातील  लाडो पंचायतीच्या माध्यमातून एक नवीन मोहिम राबवण्यात आली.  या मोहिमेला 'सेल्फी विथ डॉक्टर' असं नाव देण्यात आलं. राखी पौर्णिमेच्या दिवशी हिसारच्या विविध  गावांमधील बहिणींनी भावाला राखी बांधून  २१ व्या वर्षी लग्न करण्याचे वचन घेतले. हरियाणातील नलवा, कलांस, भोजपूर, उमरा, सातरोड, मय्यड, कंवारी, लाडावा या गावातील १५० मुलींनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. 

या पत्रात या मुलीनी नमुद केलं आहे की, ''आदरणीय पंतप्रधान मोदीजी, माझे वय १८ वर्ष  आहे. माझ्या घरातील लोक लग्नासाठी स्थळ पाहत आहेत. आपण लग्नाचे वय २१ करावे जेणेकरून आम्हाला अधिक शिकता येईल आणि आम्ही यशस्वी होऊ. '' याआधीही मुलीचं लग्नाचं वय २१ असावं याबाबत चर्चा सुरू होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी २०२० अर्थसंकल्पाच्या भाषणात तसे संकेत दिले  होते. लग्नाचं वय निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती.

१९२९ च्या कायद्यानुसार मुलींचं विवाहाचं किमान वय १४ आणि मुलांचं १८ होतं. १९७८ मध्ये या कायदयात सुधारणा करून ते अनुक्रमे १८ आणि २१ करण्यात आले. बदलता काळ आणि मुलींचा शिक्षणातील रस,  शारीरिक पोषण आणि माता मृत्यू पाहता यात बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती.पण फक्त लग्नाचं वय वाढवून महिलांशी निगडीत सर्व समस्या सुटतील का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. 

उशीरा लग्न करण्याचे फायदे

आर्थिक बाबींचा ताण कमी असतो

जे लोक उशीरा लग्न करतात ते आर्थिकदृष्ट्या बळकट असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या नात्यात पैशाची कमतरता भासत नाही. तर जे तरुण वयात लग्न करतात ते या काळात स्वत: ला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचा प्रयत्न करीत असतात. वैवाहिक नात्यातील जबाबदारी यादेखील त्यांच्यावर पडण्यास सुरुवात होते, ज्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता असते.

सेक्शुअल लाईफ 

जर आपण चुकीच्या व्यक्तीशी लग्न केले तर मग वैवाहिक आयुष्यातील रस आयुष्यातून पूर्णपणे संपेल. तर एका चांगल्या जोडीदारासह आपण आपल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही, जे लोक मोठ्या वयात लग्न करतात तेसुद्धा तरुण लोकांपेक्षा अधिक उघडपणे त्यांच्या सेक्स लाइफबद्दल बोलतात आणि आनंद घेतात, ज्यामुळे त्यांच्या विवाहित जीवनात समतोल कायम राहतो.

प्रामाणिकपणा 

जेव्हा आपण योग्य आयुष्य जोडीदाराचा शोध घेता. तेव्हा आपणबराच वेळ घेता. ज्यामुळे आम्हाला संबंधातील प्रामाणिकपणा जाणवतो. दुसरीकडे, ज्या लोकांना काही न करता चांगला साथीदार सापडतो, तेव्हा ते त्यांच्या नात्याबद्दल अजिबात गंभीर नसतात, परिणामी पती-पत्नीमध्ये संशय, भांडणं, राग आणि मत्सर वाढतो.

टॅग्स :लग्नरिलेशनशिपरिलेशनशिप