मिस्टर खिलाडी म्हणजेच अक्षयकुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलीवूडचं एक लोकप्रिय जोडपं. त्यांच्या लग्नाला जवळपास २३ वर्षे पुर्ण झाली आहेत. बॉलीवूडमधले नात्यांच्या पडझडीचे किस्से आपण नेहमीच ऐकतो. त्यात अक्षय आणि ट्विंकलचं हे नातं खरोखरच कौतूकास्पद आहे. अक्षयकुमारचा 'खेल खेल मे' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. एकमेकांचे मोबाईल लपूनछपून पाहण्यात दंग झालेली मित्रमंडळी ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्ताने अक्षयची एका वाहिनीने नुकतीच मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं की त्याचा मोबाईल जर खरंच ट्विंकलच्या हातात पडला आणि तिने तो चेक केला तर त्याची कशी रिॲक्शन असेल.. य प्रश्नावर अक्षयने दिलेलं उत्तर खरंच खूप खास आहे..
अक्षय म्हणाला की माझा फोन नेहमीच इकडेतिकडे पडलेला असतो. कधी तो माझ्या स्टाफ मेंबर्सच्या हातात असतो. त्यामुळे तो ट्विंकलच्या हातात जरी गेला आणि तिने ते पुर्णपणे तपासला तरी मला काही फरक पडत नाही. कारण तिच्यापासून काही लपवून ठेवावं, असं कोणतंही सिक्रेट त्या फोनमध्ये नाही.
इंस्टंट नूडल्स खाऊन मुलं होतात लठ्ठ? घरीच करा आटा नूडल्स, कणकेच्या नूडल्स बनविण्याची भन्नाट ट्रिक
यातूनच अक्षय आणि ट्विंकलचं नातं किती पारदर्शी आहे हे दिसून येतं. हल्ली तर एकवेळ बँकेचा पासवर्ड विचार पण मोबाईलचा विचारू नको, असं म्हणणारी तरुणाई आपल्या अवतीभोवती आहे. एकमेकांच्या फोनमध्ये सहज डोकावून पाहिलेलंही नवरा- बायको दोघांनाही आवडत नाही. मग अशावेळी फोनचा पासवर्ड मिळून जर आपला पार्टनर आपला मोबाईल तपासत असेल तर नव्या पिढीला ते अजिबात सहन होण्यासारखं नाही. हे तर थेट त्यांच्या स्पेसवरच घाव घातल्यासारखं त्यांना वाटतं...
म्हणूनच तर अशा या आजच्या जगात अक्षय- ट्विंकलचं नातं त्यांच्या चाहत्यांना खूप खास वाटतं.. लग्नानंतर ट्विंकल खन्नाने बॉलीवूडला रामराम केला. पण लिखाण, गार्डनिंग अशा क्षेत्रात तिने तिचं काम सुरू केलं.
भजी, पुऱ्या तळून झाल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं- बघा डॉक्टरांनी सांगितलेला १ उपाय
नुकतीच तिने डॉक्टरेटदेखील मिळवली आहे. आता त्यांची कार्यक्षेत्रं वेगळी आहेत. अक्षय म्हणतो की त्यांच्या आवडीनिवडीही पुर्णपणे वेगवेगळ्या आहेत. पण तरीही ते दोघे एकमेकांसोबत आहेत. कारण त्यांना एकमेकांविषयी सारखेच प्रेम, विश्वास आणि आदर आहे. नातं टिकण्यासाठी, खुलण्यासाठी आणि आयुष्य सुंदर होण्यासाठी नेमकं हेच तर पाहिजे असतं...