Lokmat Sakhi >Relationship > सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation : आयुष्यातला एक महत्त्वाचा हिस्सा आपण सतीशच्या रुपाने कायमचा गमावला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 04:30 PM2023-08-18T16:30:55+5:302023-08-18T18:24:51+5:30

Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation : आयुष्यातला एक महत्त्वाचा हिस्सा आपण सतीशच्या रुपाने कायमचा गमावला आहे

Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation : Satish Kaushik may not return but I Can be the father of his daughter; Anupam Kher said.. | सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक हे जग सोडून गेले तेव्हा अनेकांना धक्का बसला. त्यांचे जवळचे मित्र असलेल्या अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला. सतीश कौशिक यांची पत्नी आणि मुलगी वंशिका पूर्णपणे कोसळले होते. मार्चमध्ये कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याने कौशिक यांचे निधन झाले. वडीलांची जागा ही जगात कोणीही कधीच भरुन काढू शकत नाही. मात्र वंशिका हिला वडीलांची कमी भासू नये यासाठी अनुपम खेर तिची खूप काळजी घेत आहेत. आपल्या बिझी शेड्यूलमधू ते वंशिकासाठी खास वेळ काढतात असे त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. अनुपम खेर वंशिकासोबत नेहमी इन्स्टाग्रामवर रिल्स शेअर करत असतात. आपण सतीशला परत आणू शकत नाही पण त्याच्या मुलीचा बाप नक्की बनू शकतो असे अनुपम म्हणाले (Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation). 

(Image : Google)
(Image : Google)

आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा हिस्सा आपण सतीशच्या रुपाने कायमचा गमावला आहे, सतीश माझ्यासाठी खूप सवयीचा भाग होता काऱण तो मला रोज फोन करायचा. आपण त्याला खूप मिस करतो असेही अनुपम यांनी सांगितले. सतीश हे जग सोडून जाण्याआधीही मी नेहमी त्याच्या घरी जात असे आणि वंशिकाशी गप्पा, दंगा मस्ती करत असे. पण आता मी मुद्दामहून तिच्यासाठी वेळ काढून तिला भेटायला, तिच्याशी गप्पा मारायला त्यांच्या घरी जातोच जातो. वंशिकाच्या वडीलांची म्हणजेच सतीशची जागा जगातले कोणीच कधीच घेऊ शकत नाही. पण तिच्यासोबत वडीलांसमान कोणी आहे याची जाणीव तिला नक्की करुन देऊ शकतो. तिला भावनिक ताकद देण्याचा माझा प्रयत्न असतो असेही अनुपम खेर म्हणाले. 

(Image : Google)
(Image : Google)

अनुपम म्हणतात, सतीश गेल्यानंतर वंशिका खूप काळ बरीच शांत होती, मात्र आता ती त्यातून थोड्या प्रमाणात का होईना बाहेर येत आहे. तिला वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडत आहे. ती माझ्याशी तिच्या मित्रमंडळींबद्दल आणि तिच्या आयुष्यातील गोष्टींबद्दल खूप शेअर करते. तिचा दिवस कसा गेला हे ती मला आवर्जून सांगते. आपले वडील सांगायचे कोणाला हसवणे अगदी सोपे असते आणि मी त्याचीच प्रॅक्टीस करतो आहे असे अनुपम खेर म्हणाले. 

Web Title: Anupam Kher Talk about Satish Kaushik Death and his Daughter Vanshika’s situation : Satish Kaushik may not return but I Can be the father of his daughter; Anupam Kher said..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.