Lokmat Sakhi >Relationship > माझं करिअर व्हावं म्हणून ‘त्याने’!- अनुपमा फेम रुपाली गांगुली सांगतेय, नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून..

माझं करिअर व्हावं म्हणून ‘त्याने’!- अनुपमा फेम रुपाली गांगुली सांगतेय, नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून..

Anupama fame actress Rupali Ganguly Spoke About Her Real Life Husband: 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली टीव्हीची सर्वात लाेकप्रिय अभिनेत्री सांगतेय आपल्या जोडीदाराचा मोठेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2023 04:35 PM2023-08-25T16:35:23+5:302023-08-25T16:36:38+5:30

Anupama fame actress Rupali Ganguly Spoke About Her Real Life Husband: 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली टीव्हीची सर्वात लाेकप्रिय अभिनेत्री सांगतेय आपल्या जोडीदाराचा मोठेपणा

Anupama fame actress Rupali Ganguly praises her husband for his great support to her carrier.. says he willingly took the back seat for her. | माझं करिअर व्हावं म्हणून ‘त्याने’!- अनुपमा फेम रुपाली गांगुली सांगतेय, नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून..

माझं करिअर व्हावं म्हणून ‘त्याने’!- अनुपमा फेम रुपाली गांगुली सांगतेय, नवऱ्यानं सपोर्ट केला म्हणून..

Highlightsमाझा मुलगा माझ्यापेक्षाही त्याच्या बाबाशी जास्त ॲटॅच आहे, ही खरोखरच माझ्यासाठी जास्त आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे, असंही रुपाली सांगते. 

नवरा, सासू यांच्या जाचामुळे करिअर, आयुष्य यांच्यावर कसा वाईट परिणाम होत गेला ही 'अनुपमा'ची (Anupama) कहानी तर सध्या हीट आहे.. या परिस्थितीवर अनुपमाने केलेली मात आणि त्यातून काढलेला मार्गही अनेकींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र अनुपमाचा म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली हिचा नवरा म्हणजेच अश्विन वर्मा मात्र तिच्या स्क्रिन लाईफ नवऱ्याच्या अगदी विरुद्ध आहे. त्याच्याविषयीच एका मुलाखतीदरम्यान रुपाली अगदी भरभरून बोलली आणि तोंडभरून नवऱ्याचं कौतूक केलं. (Rupali Ganguly praises her husband for his great support to her carrier)

 

आजही बायकोच्या करिअरला आडकाठी करणारे अनेक नवरे आहेत. पण तरीही त्यातल्या त्यात सकारात्मक बाजू अशी की अशा नवऱ्याचं प्रमाण कमी होऊन बायकोच्या करिअरला मदत करणाऱ्या, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या नवऱ्यांची संख्या वाढते आहे.

साेनम कपूरच्या एक वर्षाच्या बाळाच्या बुटांची किंमत ४२०००! एवढे महाग, त्यात असं खास काय?

असं जरी असलं तरी अजूनही बायकोच्या करिअरसाठी स्वत:चं करिअर बाजूला ठेवून किंवा थांबवून घराकडे लक्ष देणारे नवरे अगदी नगण्य आहेत. किंवा 'की ॲण्ड का' अशा चित्रपटांमधूनच त्यांची झलक पाहायला मिळते. पण रुपालीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र असंच काहीसं आहे. 'साराभाई' मालिकेनंतर काही वर्षांनी रुपालीने करिअरमध्ये ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा 'अनुपमा'च्या माध्यमातून तिच्या करिअरला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यामुळे साहजिकच तिला कुटूंब आणि मुलाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नाही.

 

त्यामुळेच तर नवऱ्याने त्याच्या करिअरमधून ब्रेक घेतला असून तो माझ्या करिअरसाठी स्वत:हून बॅकसीटवर गेला आहे, असं रुपालीने नुकतंच ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

बाथरुममध्ये सतत कुबट वास येतो? ५ सोपे उपाय, दुर्गंध गायब- बा‌थरुम कायम राहील सुगंधी- स्वच्छ

ती म्हणते की तिचा नवरा आज त्यांच्या घराची, मुलगा रुद्रांश याची सगळी जबाबदारी सांभाळतो आहे आणि करिअरसाठी तिला पुरेसा वेळ देतो आहे. माझा मुलगा माझ्यापेक्षाही त्याच्या बाबाशी जास्त ॲटॅच आहे, ही खरोखरच माझ्यासाठी जास्त आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे, असंही रुपाली सांगते. 

 

Web Title: Anupama fame actress Rupali Ganguly praises her husband for his great support to her carrier.. says he willingly took the back seat for her.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.