Lokmat Sakhi >Relationship > किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

Relationship: 'बायकांच्या पोटात काही राहात नाही......' असं म्हणतात ना, ते काही अगदीच चुकीचं नाही. काही जणी असतातच अशा. ज्या मनातलं सगळं सगळं बोलून मोकळं हाेतात. पण असं कुणाकडेही मन मोकळं करणं तुमच्यासाठीच घातक तर ठरत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 03:58 PM2021-11-25T15:58:57+5:302021-11-25T16:00:41+5:30

Relationship: 'बायकांच्या पोटात काही राहात नाही......' असं म्हणतात ना, ते काही अगदीच चुकीचं नाही. काही जणी असतातच अशा. ज्या मनातलं सगळं सगळं बोलून मोकळं हाेतात. पण असं कुणाकडेही मन मोकळं करणं तुमच्यासाठीच घातक तर ठरत नाही ना?

Any women should not share these things to anyone...... | किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

किती बोलता? का बोलता एवढं? जबान संभालके, तोंडाला लगाम नाहीतर आयुष्यभर पस्तावाल..

Highlightsकोणत्या गोष्टीकडे कोण कसं बघेल आणि त्याचा काय अर्थ घेईल, हे सांगता येत नाही. 

बायका आणि गॉसिप्स (ladies and gossips), बायका आणि त्यांच्या गप्पा... किंवा बायकांची बडबड (girls talk)करण्याची, खूप बोलण्याची सवय... अशा काही गोष्टी नेहमीच चर्चेचा आणि बऱ्याचदा हसण्यावारी नेण्याचा आणि टिंगलीचा विषय असतो. बायका फार बोलतात, थांबतच नाहीत, सतत बकबक करतात असं पुरुष म्हणतात आणि बायका पुरुष सगळेच ते खरं मानतात. मात्र बायकाच गॉसिप करतात, अति बोलतात असं सरसकटीकरण अजिबात योग्य नाही. पुरुषही खूप बोलतात, गॉसिप आणि राजकारण करतातच. मात्र अनेक बायका बोलतात, एकदाचे तिकडे सांगतात, कुणाला सांगू नकोस म्हणून सिक्रेट (secret) शेअर करतात, तेव्हा त्यांच्या पोटात काही राहत नाही आणि मग पस्तावतात की कसं ग बाई मी चुकून बोलून गेले.. आपल्याला कळालेली माहिती कधी एकदा आपण दुसऱ्यांना सांगतो, असं काही जणींना होऊन जातं. 

 

आपल्याला माहीत असलेली गोष्ट जेव्हा दुसऱ्यांना सांगतात, तेव्हा त्यांना कुठे शांत वाटतं. पण मैत्रिणींनो असं करणं खरंच इतकं गरजेचं असतं का?
1. बऱ्याचदा बोलण्याच्या नादात आपण चार गोष्टी जास्तीच्या सांगून टाकतो तिखट मीठ लावून. अशा गोष्टी खरंतर कधीच कुणाजवळ शेअर करू नयेत. कारण कोणत्या गोष्टीकडे कोण कसं बघेल आणि त्याचा काय अर्थ घेईल, हे सांगता येत नाही. 
2.तुमच्या जवळच्या मैत्रिणीशी, बहिणीशी तुम्ही बोला... त्यांना सगळं सांगा.. पण काल परवा भेटलेल्या व्यक्तीजवळ भडाभड मन मोकळं करणं कधी- कधी तुमच्यासाठीच धोकादायक ठरू शकतं.
३. असं बोलण्यामुळे कदाचित नात्यांमध्ये दुरावाही येऊ शकताे. त्यामुळे स्वत:ला आणि आपल्या भाेवती गुरफटल्या गेलेल्या नात्यांना सांभाळण्यासाठी बोलताना थाेडं सांभाळून. विचार करून बोला.

 

या काही गोष्टी कुणाशी शेअर करू नका.... 
Do not share these things to anyone...

- तुमची एखादी लव्हस्टोरी असेल, तर ती अगदी जवळच्या व्यक्तीशिवाय कुणासोबतच शेअर करू नका.
- तुम्हाला एखादा आजार असेल, तर त्याची माहितीही भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देण्याची काही गरज नाही.
- जर तुम्हाला एखाद्याने त्याच्या आयुष्यातली खूप पर्सनल गोष्ट सांगितली असेल आणि ती कोणालाही तुम्ही सांगू नये, अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असेल, तर ती गोष्ट चुकूनही कुठे बोलू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर दाखवलेला विश्वास तोडू नका.
- तुमचे तुमच्या नवऱ्यासोबत, सासूसोबत, जावेसोबत किंवा घरातल्या कुणाही व्यक्तीसोबत झालेले लहान- मोठे वाद लगेच कोणा घराबाहेरील व्यक्तीला, मैत्रिणीला जाऊन सांगू नका. घरातल्या छोट्या- छोट्या गोष्टी घरातच ठेवा. कारण वादाचे, भांडणाचे कारण छोटे असते, ते लगेच मिटूनही जाते. पण त्या दुसऱ्या व्यक्तीने कान भरले तर विनाकारण मन कलुषित होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो.
- घरातल्या आर्थिक गोष्टी, तुमच्यावरचे कर्ज, नवऱ्याचा आणि तुमचा पगार अशा गोष्टी उगीच इतरांना सांगू नका, कुणी जवळचे योग्य सल्ला देणारे असेल तर गोष्ट वेगळी.

 

Web Title: Any women should not share these things to anyone......

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.