लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात (Relationship). स्वभाव, प्रेम, समजूतदारपणा आणि ऍडजेस्टमेंटवर संसाराचा डोलारा उभा राहतो. यासह अनेक पैलू आहेत. पण जर संसारात मिठाचा खडा पडला, तर मात्र गोष्ट डिव्होर्सपर्यंत पोहचते (Divorce). आणि नातं संपुष्टात येते. गेले काही महिन्यांपासून आपण बॉलीवूड कपल्समधले डिव्होर्सचे प्रकरण पाहिले असतील.
नुकतंच ऑस्कर पुरस्कार विजेते गायक ए आर रहमान (A R Rehman) आणि सायरा बानो (Saira Bano) यांनी काडीमोड घेतला. लग्नाच्या २९ वर्षानंतर त्यांनी नातं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याची माहिती एक्सवर पोस्ट करत दिली.
ए आर रहमान च्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आईने सायरा बाणसोबत लग्न जुळवून दिले होते. मात्र, इमोशनल स्ट्रेनमुळे त्याचं नातं संपुष्टात आलं. दरम्यान, इमोशनल स्ट्रेन म्हणजे काय? यामुळे नात्यात कटुता येते का?(AR Rahman gets emotional after announcing separation from wife Saira Banu: 'In this shattering, we seek meaning').
भारतीय राजमा ठरला जगात भारी, 'बेस्ट बिन्स डिश' म्हणून मिळाली ओळख, राजमा चावलचा खास स्वाद
प्रेम असूनही इमोशनल स्ट्रेनमुळे होतो त्रास
सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह सांगतात, 'लग्नाच्या २९ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नात्यातील इमोशनल स्ट्रेन हे एक मुख्य कारण आहे. अपार प्रेम असूनही या तणावामुळे त्यांच्यात दरी निर्माण झाल्याचे आले आहे.
इमोशनल स्ट्रेन म्हणजे काय?
जेव्हा नात्यातील वाढते अंतर हे नातेसंबंधातील तणावाचे कारण बनते, तेव्हा त्याला भावनिक ताण म्हणतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे की कम्युनिकेशन गॅप, विश्वासाच्या अभावामुळे, संशय वाढणे इत्यादी. याशिवाय नात्यातील विश्वास गमावणे हे तणावाचे सर्वात सामान्य कारण आहे. यामुळे बरेच नाते संपुष्टात येतात.
लग्नाला ३० वर्ष पूर्ण होतील असे वाटले होते पण..
ए आर रहमानने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी लिहिले की, आम्ही ३० वर्षे पूर्ण करू अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपली खंत मांडली आहे.
बाईईई!! काय प्रकार? - टॉवेल गुंडाळून इंडिया गेटसमोर नाचणारी ती तरुणी नेमकी कोण? असं का करतेय..
इमोशनल स्ट्रेनशी सामना कसा करावा?
रीड हेल्थच्या अहवालानुसार, इमोशनल स्ट्रेनशी लढण्यासाठी एकमेकांशी संवाद साधा. मुक्त संवाद हे मजबूत नातेसंबंधाचे लक्षण असते. तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक गोष्ट शेअर करा. तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगत नाही तोपर्यंत त्यावर उपाय शोधणं कठीण होईल. जर आपल्याला जोडीदाराला काडीमोड द्यायचं असेल तर, मित्र आणि नातेवाईकांशी बोला.