म्हणजे बायकांच्या आयुष्यात पुरुषांना काही स्थान, काही महत्त्वच नाही का? पुरुष इररिलेव्हेण्ट आहेत? असा प्रश्न अक्षय कुमारने बायकोला म्हणजेच ट्विंकल खन्नाला जाहीर विचारला. ती ही हसत म्हणाली, डेझर्ट-जेवणानंतरचे गोड पदार्थ ते कामाचे नाहीत असं कोण म्हणेल? हसत हसत मिश्किल अशी ही प्रश्नोत्तराची जुगलबंदी रंगली आणि त्यातून उलगडलं बायकाेच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या नवऱ्याचं एक रुप. (Twinkle Khanna answers very smartly on the husband Akshay Kumar's tricky question)
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलीवूडमधलं एक जोडपं. ट्विंकल अभिनय क्षेत्रापासून दूर गेली आणि इंटेरिअर डिझायनिंगपासून ते पुस्तकं लिहिण्यापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टीत यशस्वी पदार्पण केलं.
नवरीने लग्नात घातला चक्क डेनिमचा लेहेंगा तर नवरदेवाने डेनिम कुर्ता- बघा ही भलतीच फॅशन
ती एक यशस्वी कॉलम रायटर आहे. ते दोघेही एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाढवळ करत नाहीत. त्यांच्या भिन्न विचारधारा तर जगजाहीर आहेत. पण गरज पडल्यास एकमेकांना खंबीर साथ मात्र नेहमीच देतात. खुद्द ट्विंकलनेच एका मुलाखतीत यादरम्यान सांगितलं आहे. त्या मुलाखतीचा किस्सा अतिशय रंजक असून अक्षयने सगळ्यांसमोरच एक प्रश्न विचारून ट्विंकलला गुगली टाकली.. असा अचानक तो प्रश्न आल्याने ट्विंकल क्षणभर गडबडली. पण खूप स्मार्टपणे तिने प्रश्नाचं उत्तर दिलं. बघा अक्षयचा नेमका प्रश्न काय होता आणि उत्तर काय मिळालं.
ट्विंकल खन्ना लिखित 'Welcome to Paradise' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी अक्षयकुमार सामान्य प्रेक्षकांसोबत व्यासपीठाच्या खाली बसलेला होता.
रोजच्या वापरासाठी चहाचे कप घ्यायचे? बघा ३ पर्याय- कमी किमतीत सुंदर खरेदी
करण जोहर ट्विंकलची मुलाखत घेत होता. यावेळी अक्षयने हात वर केला आणि एक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. ते बघताच अक्षयचा प्रश्न काय असणार याची उत्सूकता ट्विंकलसह सगळ्यांच्याच मनात होती. अक्षय म्हणाला हे पुस्तक महिलांवर आधारित आहेत. सगळ्या महिलांचेच यात उल्लेख आहेत. मग असं असताना पुरुष खरंच ‘इररिलेव्हण्ट’ आहेत का?
आता ट्विंकल काय उत्तर देते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
याबाबत ट्विंकलने जी पोस्ट शेअर केली, त्यामध्ये ती म्हणाली की अक्षयच्या या प्रश्नाचं उत्तर देताना शब्दांची जुळवाजुळव करण्यासाठी मी मनातल्या मनात कित्येकवेळा कोलांटउड्या मारल्या.
घरीच करा ढाबास्टाईल लसूणी मेथी, चव अशी भारी की सगळेच विचारतील ही खास रेसिपी
आणि नंतर त्या कठीण प्रश्नाचं उत्तर मला सुचलं. ट्विंकल अक्षयला म्हणाली की जेवणानंतर डेझर्ट खाणं इररिलेव्हण्ट असतं का? तर नाही. उलट यामुळे तुमचा आनंद आणखी वाढतो. तसंच पुरुषांचं आहे. आनंदी राहण्यासाठी, आयुष्य एन्जॉय करण्यासाठी पुरुषांची साथ गरजेची आहेच. आपल्या चाळीशीनंतरच्या शिक्षणासाठी अक्षयने कशी साथ दिली. लेकीला घेऊन मी दूरदेशी शिकायला गेले तर तो किती खंबीरपणे माझ्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिला हे ही तिने सांगितले.
नवराबायकोची विचारधारा वेगळी असली तरी त्यांच्यातलं अण्डरस्टॅण्डिंग उत्तम असेल तर आयुष्य सोपं आणि हसरं होतं याचं हे उदाहरण.