व्हॅलेंटाईन्स डे या दिवसाने तरूण वर्गात वेड लावलं आहे. फेब्रुवारी महिना आला की प्रेमीयुगुल आपल्या प्रियकरासाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करतात. ७ तारखेपासून सुरु होणाऱ्या या व्हॅलेंटाईन्स विकमध्ये प्रपोज डे, टेडी डे, चॉकलेट डे, अशा प्रकारचे विविध दिवस १४ तारखेपर्यंत साजरा करण्यात येतात. खरं तर प्रेमाची सुरुवात प्रपोजने होते. मात्र, प्रेम व्यक्त करायला कुठला दिवस, मुहूर्त आवश्यक नसतो. हवं तेव्हा, हव्या त्या दिवशी ते प्रेम व्यक्त करता येतं. दरम्यान, प्रपोज करावे कसे? आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाची भाषा बोलून दाखवावी कशी? असा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. जर आपल्या प्रपोजची स्टाईल समोरच्या व्यक्तीला आवडली की, ती व्यक्ती तो क्षण आपल्या मनात कोरून ठेवते. त्यामुळे आपल्या क्रशला प्रपोज करण्यापूर्वी या १० गोष्टी लक्षात ठेवा. या १० टिप्स आपल्याला प्रपोज करण्यापूर्वी नक्कीच मदत करतील.
प्रेम व्यक्त करताना या १० गोष्टी लक्षात ठेवा
मुलगी कितीही आधुनिक असली तरी ती मनाने भारतीय असते. प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंध महत्त्वाचे असतात. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना आपण त्यांच्याबाबत सिरीयस आहात हे दर्शवा. विनोदाने प्रपोज व्यक्त करू नका.
प्रेम व्यक्त करण्यापूर्वी क्रशच्या आवडी-निवडी जाणून घ्या. जाणून घेतल्याशिवाय प्रपोज करू नका. याने समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव जास्त पडेल. आपण त्यांच्या आवडी - निवडी जपतो हे त्यांच्या लक्षात येईल.
प्रपोज करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. त्या व्यक्तीला आपण अनोळखी आहोत असे वाटायला नको. त्यामुळे आधी त्यांच्याशी मैत्री करा, जेणेकरून पार्टनर तुम्हाला अधिक ओळखू शकेल.
जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि त्यांना आपण प्रपोज करणार असाल तर, आधी हे जाणून घ्या की, तो व्यक्ती दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्याच्या प्रेमात असू शकते. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाणून घ्या.
प्रेम व्यक्त करताना मोठ्या - मोठ्या गोष्टी बोलू नका. सिरीयस राहून फक्त मनातल्या भावना व्यक्त करा. जेणेकरून ते तुमच्यावर विश्वास ठेऊ शकतील.
प्रेम व्यक्त करताना शांत जागा निवडा. जिथे पार्टनर तुमचे शब्द काळजीपूर्वक ऐकू शकतील. खूप गर्दीची किंवा गोंगाटाची ठिकाणे टाळा.
प्रेम व्यक्त करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटत असलेल्या ठिकाणी नेऊ नका. याने आपली प्रतिमा त्यांच्यासमोर खराब होण्याची शक्यता निर्माण होते.
प्रेम ही एक निखळ मनाची भावना आहे. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जोडीदाराच्या घरातील व्यक्तींसह जुळवून घ्या. याने आपण सिरीयस आहोत हे निदर्शनास येईल. यासह तुमच्या भावनांचे गांभीर्य समजेल.
पार्टनरला प्रपोज करण्यापूर्वी स्वतः वरील आत्मविश्वास वाढवून जा. यासह प्रपोज करण्यापूर्वी चांगली तयारी करून जा. याने समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन पडेल.
प्रपोज करताना तुमच्या भावनांबरोबरच जोडीदाराच्या भावनांचाही आदर करा. जोडीदारावर दबाव येईल असे काही करू नका. अनेकदा लोक सर्व मित्रांसमोर खुलेपणाने प्रेम व्यक्त करतात. यामुळे जोडीदारावर दबाव येतो. त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घ्या.