सध्या 'टॉक्सिक' हा शब्द ट्रेण्डिंगमध्ये आहे (Relationship). रेड फ्लॅग लोकांचा स्वभाव हा टॉक्सिक असल्याचं बोललं जातं. पण एखाद्याच्या टॉक्सिक स्वभावामुळे दुसऱ्याची मेण्टल हेल्थ खराब होऊ शकते (Mental Health). शिवाय नात्यात कटुता देखील निर्माण होते (Toxic). पण टॉक्सिक बिहेविअर म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल.
टॉक्सिक बिहेविअर ओळखणं कठीण. पण जर समोरचा व्यक्ती मारहाण करायला अंगावर धाऊन येत असेल किंवा भावनात्मकदृष्ट्या त्रास आणि धमकावत असेल तर, याच चुकीच्या वागणुकीला टॉक्सिक बिहेविअर असं म्हणतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला मानसिक आणि भावनात्मक स्वरूपात त्रास होऊ शकतो. टॉक्सिक बिहेविअर ओळखायचं असेल तर, या ५ गोष्टी सिग्नल आहेत असं समजा(Are You in a Toxic Relationship? Signs and How to Cope).
टॉक्सिक बिहेविअर म्हणजे काय?
- लोकांवर विनोद करणे, त्यांच्या दिसण्याची खिल्ली उडवणे, त्यांच्या भाषेवर भाष्य करणे. या गोष्टी टॉक्सिक बिहेविअरमध्ये येतात.
वॉशिंग मशिनचीही गरज नाही, झटपट धुता येतील बादलीभर कपडे-लक्षात ठेवा ५ गोष्टी
- बरेच लोक सेल्फ लव्हच्या नावाखाली स्वार्थी होतात. स्वतःचाच विचार करतात, आणि इतरांच्या भावना दुखावतात. सेल्फ लव्ह म्हणजे इतरांच्या भावना दुखावणे हा होत नाही. इतरांच्या भावनांचाही विचार करा.
- काही लोक समोरच्या व्यक्तीचा आदर न करता समोरच्या व्यक्तीला काहीही बोलतात. जे चुकीचे आहे. प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक योग्य पद्धत असते, याचे पालन करून कोणतीही गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगा.
ओल्या नारळाच्या वड्या करा फक्त १५ मिनिटांत, खुटखुटीत-पांढरीशुभ्र वडी तोंडात टाकताच विरघळेल
- बरेच लोक एरोगेंसीला कॉण्फिडन्स समजतात. इतरांशी वाद घालणे, मोठ्याने बोलणे, लोकांचा आदर न करणे या गोष्टीला लोक आत्मविश्वास समजतात. परंतु हा स्वभाव अहंकारी असतो आणि आत्मविश्वास नसतो. या अहंकारी आत्मविश्वासामुळे इतरांच्या भावना दुखावू शकतात.
- काही लोक फार डोमिनेटिंग असतात. ते आपला स्वभाव दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात. जे चुकीचं आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते.