Join us  

टोमणे मारताय, चेष्टेत कुजकट बोलून म्हणता गंमत केली.. सावधान, तुमचं ब्रेकअप होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 6:15 PM

''दिल पे पथ्थर रख के मुह पे मेकअप कर लिया.. मेरे सैंया जी से आज मैने ब्रेकअप कर लिया.. '' हे गाणं ऐकायला जेवढं मस्त आहे ना, तेवढंच कठीण ब्रेकअपचा त्रास सहन करणं आहे. त्यामुळे जर हे गाणं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असं वाटत असेल, तर अगदी आजपासूनच 'या' काही गोष्टी करणं सोडून द्या.

ठळक मुद्देनात्यामध्ये नेहमी पारदर्शकता ठेवा. एकमेकांवर विश्वास असला, तरच नातं टिकतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. सतत संशय घेऊ नका. 

प्रेमात पडणं आणि ब्रेकअप होणं, हे २०२१ च्या फास्ट मुव्हिंग जनरेशनसाठी अगदीच नविन नाही. जुन्या काळी प्यार सिर्फ एक बार होता था... आता मात्र प्रेमाची आणि ब्रेकअपची व्याख्या पार बदलून गेली आहे. आजकाल कॉलेजच्या प्रत्येक वर्षी नवी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड शोधणारी मुले- मुली प्रत्येक कॉलेजात सापडतात. पण जेव्हा आपण सिरिअसली कुणाच्या तरी प्रेमात पडतो ना, तेव्हा मात्र ते नातं जपण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो. प्रेम ते लग्न असा सुंदर स्वप्नांचा प्रवासही मग सुरू होतो. म्हणूनच तुम्हाला अगदी मनापासून क्लिक झालेल्या पार्टनरसोबत ब्रेकअप होऊ द्यायचं नसेल ना, तर काही गोष्टींची काळजी मात्र नक्की घ्या.

 

गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड नात्यात एकमेकांना काही कमिटमेंट दिलेल्या असल्या तरी लग्नाच्या नात्यात असतात, तेवढी बंधनं या नात्यात नक्कीच नसतात. त्यामुळे कधी कधी एकमेकांच्या चुकांकडे अगदीच डोळेझाक केली जाते तर कधी राईचा पर्वत केला जातो. मग अगदी छोटेसे कारणही मोठ्ठ्या भांडणाला पुरेसे होऊ शकते. म्हणून काही गोष्टींची काळजी घ्या, अकारण होणारी भांडणं टाळा म्हणजे मग ब्रेकअपच्या फंदात पडण्याची वेळच येणार नाही.

 

१. टोमणे मारू नकाजाेडीदाराला जर सतत टोमणे मारत असाल ना, तर तुमच्या नात्यात मोठा ट्विस्ट येऊ शकतो, हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. आता जोडीदाराची सहनशक्ती चांगली असेल तर कदाचित तुमचं नातं टिकू शकतं. पण त्याच्या सहनशक्तीचा तरी किती अंत पाहणार? त्याचा एकदिवशी नक्कीच विस्फोट होईल आणि तो तुम्हाला ब्रेकअपपर्यंत घेऊन जाईल.

 

२. जुन्या चुका सारख्या ऐकवू नकाचुका सगळ्यांकडूनच होऊ शकतात, हे मान्य करा. जर तुमच्या जोडीदाराने करू नये त्या चुका केल्या असतील आणि चुका लक्षात आल्यावर तुमची क्षमाही मागितली असेल, तर हे प्रकरण तिथेच थांबवा. त्याला आणखी खतपाणी घालून ते वाढवू नका आणि जुन्या चुका सारख्या सारख्या उगाळत बसू नका. नाहीतर एखाद्या दिवशी तेच तेच ऐकून कंटाळून गेलेला जोडीदार कायमचा तुमच्यापासून दूर निघून जाईल.

 

३. एकमेकांची स्पेस जपाजोडीदाराने आपल्याला दिवसभरातील सगळ्या लहान- सहान गोष्टी सांगितल्याच पाहिजे, कुठे गेला, कुणाला भेटला, काय केलं, काय खाल्लं हे सगळं सगळं जोडीदाराने आपल्याला सांगायलाच हवं, असं तुम्हाला वाटत असेल, तर ते अतिशय चूक आहे. एवढं रिपोर्टिंग करणं अतिशय कंटाळवाणं असतं. जोडीदाराला त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्याला ते एन्जॉय करू द्या. एकमेकांची स्पेस जपा. एकमेकांमध्ये संवाद जरूर हवा. पण एकमेकांशी खूप कमी आणि खूप जास्त बाेलणे बऱ्याचदा भांडणाला कारणीभूत शकते. 

 

४. तुमच्या 'एक्स'शी तुलना नकोजोडीदाराला आपल्या एक्स पार्टनरबद्दल सांगून नात्यामध्ये पारदर्शकता ठेवणं कधीही चांगलं. पण एकदा सगळं सांगून टाकल्यावर पुन्हा त्याच त्या गोष्टी आणि जुन्या आठवणी उगाळत बसू नका. आपला आताचा पार्टनर आणि एक्स पार्टनर यांची मनातल्या मनातही तुलना करू नका. यामुळे तुम्हाला तर त्रास होईल आणि तो त्रास तुमच्या वागण्या- बोलण्यातून जाणवू लागला की जोडीदारही वैतागून जाईल. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप