सत्य घटनांवर आधारीत वगैरे चित्रपटांपेक्षा आजकाल साय-फाय(sci-fi) म्हणजेच काल्पनिक सिनेमे जास्त चर्चेत असतात. ( bad boys era young girls find them 'hot'!)नविन पिढी असे काल्पनिक चित्रपट, वेबसिरीज बघून त्यात मन रमवतात. पण या प्रकारच्या कोरियन ड्रामा, वॉम्पायर सिरीज, हॉलिवुड मुव्हीज किंवा काही हिंदी सिनेमेसुद्धा चुकीच्या कल्पनांची बीजे रोवतात.
आजकाल मुलींमध्ये पाणीपुरीपेक्षाही जास्त फॅन्टसी मुव्हीज व पुस्तकांची चर्चा असते.( bad boys era young girls find them 'hot'!) या पुस्तकांमध्ये फार चालणारी संकल्पना म्हणजे बॅडबॉईज. बऱ्याच जणी या काल्पनिक पात्रांच्या एवढ्या प्रेमात पडतात की खऱ्या आयुष्यातही असाच मुलगा शोधायला लागतात. पण मग वास्तव आणि काल्पनिक यात फरक असतो याचा विचार कोण करणार. एखाद्या फिक्शनल पात्राच्या मागे एवढे वेडे होणे चांगले नाही.
नक्की काय आहे बॅडबॉय संकल्पना?
मुळात नावातच बॅड येत. बॅडबॉय म्हणजे वाईट मुलगा जो दिसायला चांगला आहे.( bad boys era young girls find them 'hot'!) असा मुलगा जो गुंड प्रवृत्तीचा आहे. मारामाऱ्या करतो. कोणाचच ऐकत नाही. कामधंदा करत नाही. दिसायला छान आहे. छान म्हणण्यापेक्षा आताच्या भाषेत हॉट आहे. जीमला जातो आणि मुलींना जास्त भाव देत नाही. उद्धट आहे. ज्याला लोकं घाबरतात. ( bad boys era young girls find them 'hot'!) एकंदरीत जसं एखाद्याने असूच नये तसा हा मुलगा असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही मुलींना तो प्रचंड अॅटरॅक्टिव्ह वाटतो.
मुळात असा मुलगा आवडणं हेच चुकीचं आहे. तरी अशी पात्र आवडतात तर ती आवड पात्रांपुरतीच मर्यादित राहायला हवी. फॅन्टसी वर्ल्ड आणि वास्तव यात जमीन आस्मानाचा फरक आहे. सीमा आनंद ज्या स्वतः एक उत्तम लेखिका आहेत त्या सांगतात. प्रत्यक्षात अशा मुलाशी संबंध ठेवणे सोडाच त्याच्या समोर उभे राहणेसुद्धा कठीण आहे. अशा मुलांना केवळ फॅन्टसीच्या नावाखाली आयुष्यात येऊ देऊ नका. तुमचे संपूर्ण आयुष्य वाया जाईल. आणि अशी पुस्तके जर डोक्यावर फार परिणाम करत असतील, तर ती वाचणे बंद करा. कधीच एखाद्या वाईट मुलाकडे आकर्षित होऊ नका.