लग्नानंतर महिलांच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात (Relationship). छोटे - मोठे निर्णयही विचारपूर्वक घ्यावे लागतात. निर्णय घेताना नवऱ्याची मदत होते (Bharti Singh). नवऱ्याकडूनही काही सल्ले मिळतात. माहेर सोडून जेव्हा मुलगी सासरी जाते, तेव्हा तिचा मोठा सपोर्ट सिस्टीम तिचा नवरा असतो. प्रत्येक टप्प्यात पती हा पत्नीच्या पाठीशी उभा असतो. पण पतीने पत्नीची साथच नाही दिली तर? पतीच्या पाठिंब्याशिवाय पत्नी काहीही करू शकत नाहीत का?
नुकतंच व्हायरल झालेल्या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये कॉमेडियन भारती सिंग म्हणते, 'पतीने साथ नाही तर, पत्नी काहीही करू शकणार नाहीत. जर नवरा तुमच्यावर जबाबदारी लादत असेल तर, ती जबाबदारी पत्नी एकट्याने ते पूर्ण करू शकणार नाहीत. पण जर नवरा पाठीशी उभा राहून, ''सगळं काही सुरळीत होईल.'' असं म्हटलं तर नक्कीच पत्नीला हिंमत मिळेल.' त्यामुळे पार्टनरचा सपोर्ट आवश्यक असल्याचं भारती म्हणते(Bharti Singh opens up about Husband love and Support).
जेव्हा आवडीचा व्यक्ती पाठीशी उभा असतो
भारती पुढे म्हणते, 'प्रेम करणारी व्यक्ती जर पाठीशी भक्कमपणे उभी असेल तर, आपण बोटीने नव्हे तर, चालतही समुद्र पार करू. त्यामुळे माझ्या पतीच्या पाठिंब्याने मी अनेक महासागर पार केले आहेत. नवऱ्याची साथ मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. शिवाय नवऱ्यामध्ये मित्र मिळणे, हे सोन्याहून पिवळे आहे. यामुळे आपले जीवन बदलते. अन्यथा सर्व काही बिघडते.'
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
आईनंतर पतीच सर्वस्व
भारती सांगते, 'प्रत्येकाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आईकडून ताकद मिळते. एकेकाळी माझी आई ही माझी ताकद होती. पण लग्नानंतर तिने ही जबाबदारी माझ्या नवऱ्याला दिली. आता तीच जबाबदारी माझे पती अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. तो प्रत्येक पावलावर माझी साथ देतो.'
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
पत्नीची प्रत्येक बाजू समजून घेणं गरजेचं
भारतीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीमागील तर्क जाणून घेतल्यानंतर, तुम्हाला तुमच्या पतीचा पाठिंबा किती महत्त्वाचा आहे हे समजले असेल. खरंतर लग्नानंतर सर्व काही बदलते. माहेर कायमच सोडून ती सासरी नांदते. त्यामुळे मुलीची प्रत्येक बाजू समजून घ्यायला हवी. यासह नवऱ्याने प्रत्येक पावलावर तिच्यासोबत राहून तिला धीर देणे आवश्यक आहे.