Join us  

Bloating After Sex : सेक्सनंतर ओटीपोटात प्रचंड वेदना होतात? पोट डब्ब होते? ही कुठल्या आजाराची लक्षणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 7:01 PM

Bloating After Sex : अनेकींना शरीरसंबंधांनतर पोटात गुबार धरणे, पोटदुखी, योनीमार्गात दुखणे असे त्रास होतात, ते नक्की कशाने?

वैवाहिक नात्यात संसारसुख, शरीरसुख, सेक्स हे सारंच महत्त्वाचं असतं. कामजीवन जितकं निरामय तितकं आरोग्यच नाही तर कुटूंबही आनंदी-निरोगी असते. मात्र अनेकदा या नात्यात काही अडचणीही असतात.  (Sexual Health Tips) काहीजण शरीर संबंध ठेवताना खूप पॅशनेट असतात तर काहीवेळी दोघांपैकी एक जणच पॅशनेट असतो आणि दुसऱ्याला यात फारसा इंटरेस्ट वाटत नाही. याची कारणं ही वेगवेगळी असू शकतात, संबंध ठेवताना जाणवणारा त्रासही वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. त्याविषयी बोललं जात नाही मात्र सेक्सनंतर पोटदुखी, पोट डब्ब होणे असा त्रास होऊ शकतो. (Sexual Health Symptoms Women Shouldn't Ignore)

या साऱ्याला इंग्रजीत ‘पोस्टसेक्स ब्लोटिंग’ असं म्हणतात. ते का होतं? मासिक पाळी, बॅक्टेरियाचे असंतुलन, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), यासह झालेली ॲसिडिटी, अपचन अशीही कारणं असतात. याशिवाय लैंगिक संबंधामुळे तुमचे गर्भाशय हलू शकते आणि त्याच्या सभोवतालच्या इतर अवयवांना काही धक्का लागला तरी वेदना आणि सूज येऊ शकते.

स्त्री आरोग्य तज्ज्ञ जेनिफर वाइडर, यांनी  POPSUGAR ला या वेबसाईटला दिलेल्या माहितीत त्या सांगतात, "संभोग आणि वेदनादायक मासिक पाळी दरम्यान होणारी वेदना ही वळलेल्या गर्भाशयाची चिन्हे आहेत, परंतु अनेकदा त्याची कोणतीही लक्षणे नसतात." तुमचे गर्भाशय मागे वळले आहे की नाही हे शोधण्यासाठी, तुम्हाला डॉक्टरांना भेटावे लागते.

लैंगिक संबंधानंतर पोट फुगण्याचे आणखी एक संभाव्य कारण म्हणजे तुमच्या योनीतील नैसर्गिक जीवाणूंचे असंतुलन किंवा अतिवाढ. यामुळे यीस्ट इन्फेक्शन आणि बॅक्टेरियल योनिओसिस सारख्या समस्या उद्भवू शकतात. या प्रकारचे त्रासदायक संक्रमण बहुतेक वेळा योनीमध्ये वीर्य किंवा कृत्रिम घटकांमुळे होते. डॉ. कॅबेका यांच्या मते, व्हजायनल डुशिंगमुळे तुमच्या योनीतील बॅक्टेरियावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

योनिमार्गातील बॅक्टेरिया निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी  आहारात प्रोबायोटिक्स समावेश करा. ग्लिसरीन, पॅराबेन्स आणि कोणत्याही प्रकारचे फ्लेवर्स किंवा सुगंध यासारखे कृत्रिम घटक असलेल्या पर्सनल केअर उत्पादनांपासून लांब राहा.  हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरात बरेच बदल होऊ शकतात आणि जर मासिक पाळी येणार असेल तर कदाचित तुम्हाला सेक्स केल्यानंतर असा त्रास होऊ शकतो.

उपाय काय?

1) सेक्सनंतर लगेच उठून कामाला लागू नका, थोडावेळ शांतपणे पडून राहा.

२) संबंधानंतर लगेच पाणी पिऊ नका त्यामुळे पोट फुगू शकतं. थोडा वेळ ब्रेक देऊन नंतर पाणी प्या.

३) पोटात दुखत असेल तर ओटीपोटावर थोडावेळ झोपा

४) फ्लेवर्ड कंडोमची एलर्जी असल्यास त्याचा वापर टाळा.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपलैंगिक आरोग्य