लग्न करायचं म्हटलं की मुलगी मापात असायला हवी असं आजही अनेकींना वाटतं. लग्न जमलं असेल तरी मुली लग्नाच्या तारखेपर्यंत अजून मेंटेन होण्याच्या प्रयत्नात असतात. लठ्ठपणा हा अजूनही लग्न न जमण्याचं सगळ्यात मोठं कारण समजला जातो.अलिकडे टेलिव्हिजनवरच्या मालिकांमधूनही याबाबत जगजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वीटू, लतीका या पात्रांना आपल्या लठ्ठपणामुळे टोमणे ऐकावे लागतात, लग्नाला कोणी तयार होत नाही, घरच्यांची वाढती काळजी आणि त्यातून येणारं नैराश्य, स्वत:बद्दल वाटणारा न्युनगंड मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कौन बनेगा करोडपती शो मध्ये 6 लाख 40 हजार रुपये जिंकलेल्या, तिसऱ्या स्पर्धक स्वाती श्रीलेखा यांनी शरीरयष्टीबाबत भाष्य करत सगळ्याचचं मन जिंकलं. अमिताभ बच्चन यांनी स्वाती यांना त्यांच्या व्हिडीओ क्लिपवरून वैयक्तिक आयुष्यातील एक प्रश्न विचारला . त्यावर स्वाती यांनी दिलेलं उत्तर ऐकून बिग बी आणि प्रेक्षकही प्रभावित झाले. अमिताभ बच्चन यांनी विचारलं की, ‘तुम्ही व्हिडीओ क्लिपमध्ये सांगितलं आहे की तुम्ही अविवाहित आहात आणि तुम्ही योग्य व्यक्तीची वाट पाहत आहात’.
स्वाती म्हणाल्या की, ''माझं लग्नाचं वय होतं त्यावेळी माझ्या कुटुंबियांनी माझं लग्न व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले, पण जिथे जिथे माझा फोटो पाठवला जायचा तिथून एकच प्रश्न विचारला जायचा, वजन किती आहे? यामुळेच मी अजून लग्न केलं नाही.ज्याला तुमचे वजन दिसत नाही, तर मन दिसते त्याच्याशीच लग्न करा.'' यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवत स्वाती यांच्या विचारसणीला दाद दिली. वजनावरुन कुणाला हिणवणं, कमी लेखणं ही मनोवृत्ती बदलायला हवी हेच त्यांनी अधोरेखित केलं.
स्वभाव सांगणारे, देहबोली अभ्यास असं सांगतात की, लठ्ठ मुली अधिक मनमिळाऊ असतात. इतरांचा मनाचा जास्त विचार करतात. लग्नानंतर एकमेंकाची मनं सांभाळून घेणं फार महत्वाचं असतं . सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार सडपातळ मुलींशी लग्न करणाऱ्या पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ मुलींशी लग्न केलेले पुरूष जास्त आनंदी असतात.
अनेक मुली वाढत्या वजनाची चिंता करत सारखं मोजून मापून खात नाही. तर मस्त मनापासून स्वयंपाक करतात, खातात. खाण्यातलं आनंद जगण्यात रंग भरतो.अनेकदा सड पातळ किंवा मेटेंन मुली मोजकं खातात. त्यांच्या खाण्यापिण्याचे खूप नखरे असतात.
महत्त्वाचे म्हणजे
लठ्ठ मुलींचे आपल्या पतीवर खूप प्रेम असते. त्यांच्यासाठी पतीच सगळं काही असतो कारण ती व्यक्ती त्यांना जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी तयार झालेली असते. फक्त पतीच नाही तर सासरच्या मंडळीचीही त्या काळजी घेतात. अर्थात प्रत्येकाचे स्वभाव, आजूबाजूची परिस्थिती, कौटुंबिक स्थिती, विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे काही मुली या मुद्द्यांना अपवाद असू शकतात. अर्थात या साऱ्या चर्चांपेक्षा आणि वजनाच्या आकड्यांपेक्षा महत्त्वाचे असते ते मनं जुळणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजनाचा सतत विचार न करता फिट होण्यासह मनसोक्त जगण्याची कला शिकणं. त्यामुळे वजन वाढलं म्हणून कुणी टोमणे मारले तर विसरा, आनंदाने छान जगा..