Join us  

ब्रेकअप झाले आणि प्रचंड खा-खा सुटली, वजन वाढलं? तुम्ही ब्रेकअप गेनर आहात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2022 5:52 PM

प्रेमभंग झाल्यावर आलेल्या स्ट्रेसमुळे अनेकजण खूप खाऊ लागतात, त्यातून त्यांच्या मनासह शरीराचं आरोग्यही धोक्यात येतं..

ठळक मुद्देनाहीतर मग विनोदानं किंवा गांभिर्याने मी ब्रेकअप गेनर आहे असं सांगायची वेळ येते.

प्रेमभंग. ब्रेकअप झाला तर काय होतं? किंवा अगदी ब्रेकअप नाही झाले पण नात्यात ‘ब्रेक ‘घेतला. (हल्ली घेतात त्याला टेकींग ब्रेक असेच म्हणतात.) तर यासाऱ्यात काय होतं? मनावर ताण वाढतो, राग येतो, संताप येतो, मन कशात लागत नाही, कधीकधी फसवणूकीची भावना असते. झोप उडते. भूक कमी होते किंवा वाढते. मात्र पूर्वी जो ट्रेण्ड अमेरिकेत मोकळेपणानं बोलला जायचा तो आता आपल्याकडेही दिसतो आहे त्याला म्हणतात ब्रेकअप गेनर किंवा ब्रेकअप पूटऑन. काहीजण मोकळेपणानं सांगतातही की ब्रेकअप इटिंग सुरु आहे. स्ट्रेस इटिंगच्याच कुटुंबातले हे लक्षण की ज्यामुळे आपण आनंदी आहोत असं इतरांना आणि स्वत:ला सांगण्यासाठी अनेकजण खा खा खात सुटतात. त्यालाच ब्रेकअप बिंज असंही म्हणतात.

(Image : Google)

वॉशिंग्टन पोस्ट सारख्या वृत्तपत्रातही ब्रेकअप गेनर या ट्रेण्डची चर्चा दिसते. प्रेमभंग झाल्याच्या दु:खात अनेकजण खात सुटतात. जंकफूड खातात. कोल्डड्रिंक पितात.  चॉकलेट खातात. चहा-कॉफी पितात. मात्र त्याचा परिणाम वजनवाढीवर होतो. आणि मूडवरही. अनेकांना डोकं जड झाल्यासारखं वाटतं. पचन बिघडतं. पीसीओडी, पाळीचे प्रश्न निर्माण होतात. आणि त्यामुळे पुन्हा वजन वाढतं.. काहींना डिप्रेशनही येतं. त्या डिप्रेशनपोटी जास्त खाणंही होतं.असं चक्र सुरुच होतं. त्यातून मग आपण बरे दिसत नाही. लोक चिडवतात. इन्स्टाग्राम डिप्रेशनही वाढतं.प्रेमभंगाशी या समस्यांचा काही संबंध नसतो मात्र तरीही अनेकजण त्यात अडकतात.म्हणून तपासून पहायला हवं की आपलं असं होतं आहे का?स्वत:ला विसरुन जावं असं प्रेम होवूच शकतं, पण त्याचबरोबर आपलं स्वत:वर प्रेम आहे की नाही हे ही पहायला हवं.नाहीतर मग विनोदानं किंवा गांभिर्याने मी ब्रेकअप गेनर आहे असं सांगायची वेळ येते.

 

टॅग्स :रिलेशनशिप