Join us  

सेक्समुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते का? डॉक्टर सांगतात, खरं काय आणि गैरसमज कोणते..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 6:15 PM

Can having sex affect your skin : सेक्स करताना जास्त घाम येणे आणि शरीरातून तेल तयार होणे यामुळे मुरुम आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. पण त्वचेच्या समस्यांचा थेट संबंध सेक्सशी अजिबात नाही.

 शरीर संबंधांबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आहे. सेक्समुळे वजन वाढतं, सेक्समुळे त्वचेवर पिंपल्स येतात, असा विचार  काही लोक करतता. (Can having sex affect your skin) खरं तर यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दिव्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे सेक्सच्या त्वचेवर होणाऱ्या परिणामाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया सेक्सचा त्वचेवर कसा परिणाम होतो. (Does sex really affect skin lets check with the expert)

 पिंपल्स येतात?

डॉ. दिव्या यांच्यामते हा मोठा गैरसमज आहे. सेक्समुळे कधीच पिंपल्स येत नाही.  पण निष्काळजीपणानं त्वचा किंवा त्वचेशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.  सेक्शुअली एक्टिव्ह राहताना आपण अशा काही गोष्टी करतो  ज्या आपल्यासाठी अजिबात हेल्दी नसतात. 

१) सेक्स करताना जास्त घाम येणे आणि शरीरातून तेल तयार होणे यामुळे मुरुम आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. पण त्वचेच्या समस्यांचा थेट संबंध सेक्सशी अजिबात नाही.

२) संबंधादरम्यान मसाज तेल आणि काही रसायने असलेली उत्पादने वापरणे जी तुमच्या त्वचेला अजिबात शोभत नाही. कारण जेव्हा तुम्ही मसाज तेल वापरता तेव्हा तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या हातावरील उत्पादने तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेच्या संपर्कात येतात. जे तुमच्या त्वचेसाठी योग्य नाही.

३) पार्टनरच्या आणि स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेतली तर संबंधादरम्यान उद्भवणारे इन्फेक्शन्स, आजार टळू शकतात. 

फायदे (The Beauty Benefits Of Sex)

१) कोलोजन एक प्रकारचं प्रोटीन आहे जे त्वचेसाठी खूप महत्वाचे असते. वयाबरोबर कोलोजनचा स्तर कमी होऊ लागतो. म्हणूनच त्वचेवर एजिंग साईन्स येतात. तणाव याचं मुख्य कारण असतं. सेक्सदरम्यान हॅप्पी हार्मोन्स रिलिज होतात यामुळे ताण तणाव कमी होतो आणि त्वचेत कोलोजनचे प्रमाण  वाढते. 

आजपासूनच ५ सवयी सोडा नाहीतर ऐन तारुण्यात तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अटॅक!

२) चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणंही गरजेचं आहे. योग्य प्रमाणात झोप घेतल्यानं इम्यूनिटी मजबूत राहते. याशिवाय तुमच्या मानसिक आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होतो.  हेल्दी स्नॅक्स तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय इम्यून सिस्टिम, स्ट्रेस फ्री माईंड आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो होण्यास मदत होते. 

३) शारीरिक हालचालीदरम्यान शरीरातीलल रक्त पुरवठा व्यवस्थित राहतो. सेक्स करताना ब्लड फ्लो वाढतो. याशिवाय शरीराला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.  यामुळे त्वचा ग्लोईंग दिसून येते. 

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपब्यूटी टिप्स