Join us  

नातं टिकवायचं-रोमान्स वाढवायचा बिंधास्त बोला खोटं, ५ गोष्टी नेहमी सांगत राहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 4:53 PM

Can Lying Actually Make a Relationship Stronger? नातं टिकवण्यासाठी खोटं बोलावं लागतं हे खरं असं वाटतं तुम्हाला?

आपल्या आयुष्यात कळत - नकळत ती स्पेशल व्यक्ती येते. दोघांच्या सहमतीने नातं पुढे सरकतं. दोघांचे स्वभाव आणि ओढ हे नातं टिकवून ठेवण्यासाठी मदत करतं. रिलेशनशिप अधिक घट्ट व्हावे असं आपल्याला वाटत असेल तर, पार्टनरपासून कोणतेही गोष्ट लपवू नका. पार्टनरसोबत कधीही खोटं बोलू नका. पार्टनरच्या भावनांचं आदर ठेवा असं सांगितलं जातं पण कुणी तुम्हाला सांगितलं की जोडीदाराशी खोटं बोला तर विश्वास ठेवाल?

ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ रॉबिन डनबर यांनी केलेल्या अभ्यासानुसार, 'नातेसंबंधात एखाद्याच्या भावना दुखावण्यापेक्षा कधी - कधी खोटं बोलणे फायदेशीर ठरते. त्याने नाते अधिक घट्ट होते. म्हणजे खोटं वाटलं वरवर तरी मनापासून जोडीदाराचं कौतुक करायचं आहे, ॲप्रिशियेट करायला शिकायचं आहे तर नातं अधिक फुलतं(Can Lying Actually Make a Relationship Stronger?).

आय मिस यू

प्रत्येक व्यक्तीला आपल्या पार्टनरकडून प्रेमाची अपेक्षा असते. २४ तास पार्टनर आपल्यासोबतच असेल असे नाही. जर पार्टनर लांब असेल तर, त्यांना फोन किंवा मेसेजद्वारे आय मिस यू म्हणा. आपण जर त्यांना मिस करत नसलात तरी तसं मनापासून म्हणायला सांगायला काहीच हरकत नाही.

जुदा है मगर बेवफा तो नहीं! लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवायची तर ४ गोष्टी विसरु नका

क्या स्टाइल है!

स्तुती - कौतुक कोणाला आवडत नाही. जरा स्टाइल, कपडे याकडे लक्ष देऊन कौतुकाचे चार शब्द म्हणा. बघा चेहऱ्याचा रंग अधिक गुलाबी होईल.

स्वयंपाक-क्या बात..

कुणी आपल्याला आयतं करुन जेवायला घालत असेल, आवडनिवड जपत असेल तर स्वयंपाक, पदार्थाचे कौतुक करा.

बॉयफ्रेण्ड तुमच्याशी सतत खोटं बोलतोय हे कसं ओळखाल? ३ गोष्टी- तुमची फसवणूक तर होत नाही..

एकमेकांना गिफ्ट्स द्या

रिलेशनशिपमध्ये आपण एकमेकांना गिफ्ट्स देतोच. पण कधी आपल्याला पार्टनरने दिलेले गिफ्ट्स आवडले नाही तर, आपण ते स्वीकार करत नाही. त्यामुळे असे करू नका, गिफ्ट आवडले नाही तरी देखील त्याचा स्वीकार करा.

किती दमणार..

घराची व ऑफिसची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर असते. काही महिला घर व ऑफिस योग्यरीत्या सांभाळतात. अशा परिस्थितीत त्यांच्या या मॅनेजमेंट शैलीचे कौतुक करा. यामुळे त्यांना अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप