Join us  

Car Sex Disadvantage : ‘डान्सिंग कार’चे धोके; कार सेक्स फॅण्टसीची भूरळ- तरुणांचे मानसिक स्वास्थ्यही धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 5:04 PM

Car Sex Disadvantage : चोरुन-लपून भेटणं, कार सेक्स, त्यातली फॅण्टसी हे सारं तरुणांच्या जगात चर्चेत असलं तरी त्या साऱ्याचे धोके मात्र गंभीर आहेत.

डान्सिंग कारची कल्पना आमीर खानच्या पीकेमध्ये चर्चेत आली. शहरात माणसं किती कुचंबणा सहन करुन जगतात याचंही ते एक रुप आणि खासगीपणाचा विसर पडून वाट्टेल ते मार्ग पत्करणारे काही हे दुसरं रुप. तरुणांच्या जगात या कार सेक्सची चर्चा फॅण्टसी म्हणूनही होते आणि काहीतरी एक्सपेरिमेण्ट करुन पहायचे म्हणूनही होते. मात्र हे सारं मानसिक-शारीरिकच नाही तर सामाजिक आरोग्य म्हणूनही धोक्याचं आहे.  (Car Sex Disadvantage)

रोमॅण्टिक फॅण्टसीच्या नावाखाली वाट्टेल ते करताना आपण सभ्य समाजाचे निकष धुडकावून विचित्र आणि निर्लज्ज जगणं कधीही समाजहिताचे असू शकत नाही. त्यामुळे कार सेक्स ही कल्पना वा्हयात चर्चेचा भाग असली आणि शहरी तारुण्यात त्याची चर्चा असली तरी त्यातले धोके आणि खासगीपणाच्या मर्यादा धुडकावण्याचे गंभीर परिणाम समजून घ्यायला हवेत. (What are the Disadvantages To having Sex In a car)

मुळात प्रश्न असा आहे, की लोक असे जगजाहीर का वागतात? लैगिंक विकारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात, ''प्रामुख्याने कार सेक्स हा दोघांच्याही घरी किंवा इतर ठिकाणी प्रायव्हसी न मिळणं, हॉटेल बूक करणं न परवडणं या कारणांमुळे घडतो. किंवा चोरुन लपून चोरटे आनंद घेणं, जगापासून लपवणं नातं यातून घडतात. मात्र कोणतीही कार असो, कारला काचा असतात त्यामुळे सतत आपल्याला कोणीतरी पाहिल अशी भिती दोघांच्याही मनात असते. ज्यावेळी पुरूषाच्या मनात ही भिती असते की आपल्याला कोणीतरी पाहील, चटकन उरकावं लागेल, इथे प्रायव्हसी नाहीये अशावेळी मनमोकळेपणा राहत नाही.  पुरूषांच्या मनात भिती असताना इरेक्शनचा प्रोब्लेम येऊ शकतो इरेक्शन झालं नाही म्हणजे आपल्यात काहीतरी दोष आहे असं त्याला किंवा तिला वाटू शकतं. तर कधी घाईघाईने करताना शीघ्रपतन होण्याची शक्यता असते. गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रायव्हसी न मिळणं हा सगळ्यात मोठा तोटा यात असतो. लोक आपल्याला पकडतील, जाब विचारतील हे माहिती असूनही काहीजण हा पर्याय स्वीकारतात तो योग्य नाहीच.'' 

धोके लक्षात ठेवा...

१) पकडले जाण्याची भीती असते

सार्वजनिक ठिकाणी शारीरिक जवळीक योग्य नव्हे, लोक-पोलीस यासंदर्भात जाब विचारुन जाहीर नाचक्की होण्याचा धोका असतोच.

२) दुखापतीचे भय

जागा कमी, बळजबरी कोपर किंवा डोक्याला इजा पोहोचू शकते.

३) गुदमरल्यासारखं वाटू शकतं

इंटिमेट रिलेशन असताना शरीराचे तापमान वाढते. अशा स्थितीत बंद कारमध्ये तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटू शकते. अशा स्थितीत  एसी लावला तरीही त्रास होण्याचा धोका आहेच.

४)  मनाच्या स्वास्थ्याचं काय?

मुळात आपण जे करतोय ते चुकीचं आहे वाटून त्या गिल्टमध्येच जगणे यातून मनावर ताण येतो आणि मानसिक स्वास्थ्यही धोक्यात येऊ शकतं.

५) नातं ‘खरं’ आहे?

जे नातं चोरुन लपून सेक्स करतं, ते नातं खरं आहे की, केवळ संधीसाधू आहे याचा विचार करा, जोडीदार आपल्याला फसवत तर नसेल हा प्रश्न टाळू नका.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप