Lokmat Sakhi >Relationship > Valentines Celebration: यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताय, पहिलंच रोमँटिक सेलिब्रेशन? 5 गोष्टी करा, स्पेशल होईल दिवस

Valentines Celebration: यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताय, पहिलंच रोमँटिक सेलिब्रेशन? 5 गोष्टी करा, स्पेशल होईल दिवस

Tips for valentine day celebration: आखिर वो प्यारभरा दिन आ ही गया.. जे कपल्स यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करणार आहेत, त्यांच्या जीवाची हुरहूर तर न विचारलेलीच बरी.. तुमचा हा पहिलाचा प्रेम दिवस एकदम रोमॅंण्टिक (romantic date) करून टाकायचा असेल, तर या काही गोष्टींची तयारी तुम्ही केलीच पाहिजेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 12:44 PM2022-02-14T12:44:55+5:302022-02-14T13:54:14+5:30

Tips for valentine day celebration: आखिर वो प्यारभरा दिन आ ही गया.. जे कपल्स यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करणार आहेत, त्यांच्या जीवाची हुरहूर तर न विचारलेलीच बरी.. तुमचा हा पहिलाचा प्रेम दिवस एकदम रोमॅंण्टिक (romantic date) करून टाकायचा असेल, तर या काही गोष्टींची तयारी तुम्ही केलीच पाहिजेत..

Celebrating valentines day for the first time? then these 5 things can make your day memorable | Valentines Celebration: यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताय, पहिलंच रोमँटिक सेलिब्रेशन? 5 गोष्टी करा, स्पेशल होईल दिवस

Valentines Celebration: यंदा पहिल्यांदाच व्हॅलेंटाइन्स डे साजरा करताय, पहिलंच रोमँटिक सेलिब्रेशन? 5 गोष्टी करा, स्पेशल होईल दिवस

Highlightsआजच्या दिवशी या मोजक्या गोष्टी तुम्ही केल्या तरी तुमच्या व्हॅलेंटाईनचं मन तुम्ही जिंकलंच म्हणून समजा..

सध्या सगळीकडेच वातावरण मस्त रोमॅण्टीक झालं आहे... व्हॅलेंटाईन्सची गुलाबी नशा आता कॉलेज कट्ट्यांपासून ते पार शहराच्या बाहेर असणाऱ्या पर्यटन स्थळांपर्यंत पसरू लागली आहे. कॉलेज, रेस्टॉरंट सगळ्या ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याची आणि ते स्वीकारण्याची एकच लगबग दिसत आहे. जे यात मुरलेले पक्के खिलाडी असतात, त्यांना हा दिवस खूप काही नवा नसतो. हा दिवस खऱ्या अर्थाने खास अशा लोकांसाठी असतो, ज्यांना यावर्षी पहिल्यांदाच त्यांचं प्रेम मिळालेलं असतं.. आणि पहिल्यांदाच ते व्हॅलेटाईन्स साजरा करणार असतात..

 

आता आयुष्यात कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करायची म्हटलं की जाम टेन्शन येतं.. मग हे तर प्रेमाचं सेलिब्रेशन आणि ते ही नुकत्याच हो म्हटलेल्या आपल्या व्हॅलेंटाईनसोबत.. या सगळ्याचं प्रेशर येऊन पॅनिक होणं अगदी साहजिक आहे. बरं या बाबतीत मैत्रिणींचा- मित्रांचा सल्ला घ्यावा, तर ते ही आता त्यांच्या- त्यांच्या प्रेम दुनियेत अडकलेले... म्हणूनच तर या काही सोप्या आणि रोमॅण्टिक गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमची प्रेमाची वाटचाल सुरू करा. बघा आजच्या दिवशी या मोजक्या गोष्टी तुम्ही केल्या तरी तुमच्या व्हॅलेंटाईनचं मन तुम्ही जिंकलंच म्हणून समजा..

 

पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन्स सेलिब्रेट करताना... 
(how to celebrate valentines day for the first time?)
१. तुमचा लूक कसा आहे

आजच्या दिवशी आपल्या व्हॅलेंटाईन्सला भेटायला जाण्यासाठी तुमची जंगी तयारी सुरू झालेली असणार यात वादच नाही. पण एक्साईटमेंटमध्ये कुठे आपण ओव्हर तयार तर झालेलो नाही ना, याकडे एकदा लक्ष द्या.. तुम्हाला आज नेहमीपेक्षा छान आणि कुल दिसायचंच आहे, त्यात काही वाद नाही. पण आपला मेकअप किंवा आपला एकंदरीत सगळाच गेटअप ओव्हर व्हायला नको. 

 

२. परफ्यूमची निवड
एरवी तुम्ही कोणतंही डिओ मारा किंवा अत्तर लावा.. पण पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन्स साजरा करायला जाणार  असाल तर मात्र आजच्या दिवशी एखादं भारीचं परफ्यूम मारून जायला अजिबात विसरू नका... तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांसोबत असता, तेव्हा आजूबाजूला दरवळणारा सुगंध नक्कीच वातावरण निर्मिती करणारा, मुड बदलून टाकणारा ठरतो. त्यामुळे आजच्या दिवशी एखादा ब्रँण्डेड परफ्यूम माराच...

 

३. गुलाब आणि गिफ्ट..
व्हॅलेंटाईन्स डे ला तर या दोन गोष्टी विसरून अजिबात जमणार नाही. जर तुम्हाला खरोखरंच हा दिवस यादगार बनवायचा असेल, तर भेटल्या भेटल्या तुमच्या व्हॅलेंटाईन्सला एखादं लाल गुलाबाचं फूल देऊन ग्रीट करा.. गुलाब दिल्यानंतर लगचेच गिफ्ट नको.. थोडी वाट पाहू द्या.. थोडा वेळ घालवा आणि त्यानंतर मग गिफ्ट द्या..

 

४. कौतूक करायला विसरू नका
गुलाब देऊन ग्रीट केल्यानंतर तुमच्या व्हॅलेंटाईन्सची तोंड भरून स्तुती करा.. कारण आजचा दिवस तुमच्यासाठी जसा खास असतो, तसा त्यांच्यासाठीही असतो. त्यामुळे तुम्ही जशी तयारी केलेली आहे, तशीच त्यांनीही केली असणारच. त्यामुळे तुमच्या व्हॅलेंटाईन्सच्या दिसण्याचं, त्यांच्या लूकचं नक्की कौतूक करा.


 
५. रोमॅण्टिक गाणं..
जर तुम्ही लाँग राईडवर जाणार असाल आणि तुमच्याकडे कार असेल तर तुमच्या लाँग ड्राईव्हला सुरुवात केल्यावर एखादा शांत रस्ता सुरू झाला की लगेचच एखादं रोमॅण्टिक गाणं वाजवून टाका..  तुमच्या व्हॅलेंटाईन्सच्या आवडीचं गाणं लावलं तर आणखीनच छान.. आजच्या दिवशी वाजलेलं कोणतंही रोमॅण्टिक गाणं तुम्हाला जबरदस्त फिल देणारं असेल.. 

 

Web Title: Celebrating valentines day for the first time? then these 5 things can make your day memorable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.