एक काळ होता, घरातले वडिलधारे स्थळं पाहत आणि लग्न जुळवत. प्रेमविवाहांना मान्यता नव्हती आणि त्याचं कौतुकही नव्हतं.(Chill bro, only sex!) सुरुवातीला तर प्रेमविवाहांना समाजात-कुटुंबात विरोधच जास्त झाला. आता प्रेमविवाह करणं काही मोठी गोष्ट नाही.(Chill bro, only sex!) आता तर लिव्ह इन मध्यमवर्गातही तसं कॉमन व्हायला लागलं. त्याला अजून विरोध होतो पण सूर नरमलेलेच आहेत. योग्य-अयोग्य ठरवणंही शक्य नाही, कारण ज्याला त्याला आपापला जोडीदार मनासारखा निवडण्याचा हक्क आहेच. विवाह व्यवस्था मात्र आजही नव्या गोष्टी स्वीकारत टिकून आहे.(Chill bro, only sex!) जुन्या पिढ्या आता लिव्हइन प्रकरणंही स्वीकारत आहेत. पण त्यापुढे जात आता तरुण मुलांच्या जगात चर्चा आहे ती ओपन रिलेशनशीप, सिच्यूएशनशीप, फ्रेंडस विथ बेनिफिट्स आणि कॅज्युअल्सची!
आता या सगळ्यात नेमका फरक काय असतो नी धोेके काय असतात समजून घेऊ..
ओपन रिलेशनशीप.
अनेक सेलिब्रेटी आजकाल ओपन रिलेशनशीप मध्ये असतात. याचं मुख्य कारण आता लोकांना बंधन आवडत नाहीत. अगदी विवाहबंधनसुद्धा. प्रेम एकावरच करावं हेही पटत नाही. प्रेमात पडून किंवा अगदी लग्न करुनही दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याची सुट या नात्यात असते. त्याला ओपन रिलेशनशिप म्हणतात.
सिच्यूएशनशीप
"देखलेंगे यार, अभी चील कर. एन्जॉय कर" या मानसिकतेच्या लोकांमध्ये सिच्यूएशनशीप फारच कॉमन आहे. मुख्यत: परगावी काही महिन्यांसाठी,वर्षांसाठी जाणारे लोक असं करतात. एकत्र फिरायचे, शारीरिक संबंध ठेवायचे. पण एकदा का दूर व्हायची वेळ आली. 'मग तू तेरे रास्ते मै अपने रास्ते'.
फ्रेंडस विथ बेनेफिटस्
आपण मैत्रीला एक पवित्र नात मानतो. पण काही लोकांसाठी मैत्री शारीरिक गरजा पूर्ण करण्याचे साधन बनली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १७ ते २४ वर्षातील तरुणांमध्ये हे फारच साधारण आहे. आपल्या मित्राबरोबर फक्त शारीरिक संबंध ठेवायचे. बाकी मैत्रीच. कोणतेही नाते नाही. एकाच वेळी असे बरेच मित्र एकत्र असू शकतात.
कॅज्युअल रिलेशन
यामध्ये तर समोरच्याचे नाव माहिती असण्याची देखील गरज नाही. क्लब बार सारख्या ठिकाणी लोकांना भेटून शरीरसंबंध ठेवले जातात.
धोके काय?
१. नवीन पिढीतील अर्ध्याहून अधिक अल्पवयीन मुलं-मुली या प्रकारच्या संबंधांत असतात. यात प्रेम कुठेच नाही. फक्त लस्ट आहे. या वयात मन विचलित होणं नैसर्गिक आहे. पण म्हणून मग एवढं वाहवतं जावं का? या सगळ्यातून सेक्स ॲडिक्शन होतं. अनेक मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की आजकाल त्यांच्याकडे सेक्स ॲडिक्शन असलेले बरेच रूग्ण येतात. मुलांच्या मानसिकतेवर याचा परिणाम होतोच मात्र मुलींच्या तर शरीरावर देखील होतो.
२. मुली गरोदर होऊ नये म्हणून सेक्स आधी गोळ्या घेतात. पाळी येऊ नये म्हणून गोळ्या घेतात. फॅन्टसिज साठी वेगवेगळ्या शारीरिक क्रिया करतात. ज्या त्यांच्यासाठी हानिकारक आहेत. एकदा का शरीराला अशा गोष्टींची सवय लागली की त्याचा हार्मोन्सवर परिणाम होतो. यातूनच एन्गझायटी, मानसिक असंतूलन, गर्भपाताच्या समस्या वाढतात. पीसीओडीचा त्रास सुरू होतो. ही नाती ब्लॅकमेलिंगपर्यंत जाऊन अंगलट येऊ शकतात.
३. या सगळ्या सोयीच्या नात्यांचा विचार तरुण मुलंमुली करत नाहीत आणि क्षणिक सुखासाठी अनेक गोष्टींचा बळी जातो हे उघड आहे.