बाॅलीवूडच्या ग्लॅमरस सासूबाई म्हणून हल्ली नीतू कपूर ओळखल्या जातात. या वयात त्यांनी जपलेला फिटनेस, त्यांचं एकंदरीतच सगळं व्यक्तिमत्त्व, फॅशन सेन्स सगळंच लाजवाब आहे. आई म्हणून त्या कशा आहेत, हे तर बरेच जण जाणतात. पण सासू म्हणून आणि आता तर आजी म्हणून त्या कशा आहेत, याविषयी त्यांच्या चाहत्यांच्या मनात उत्सूकता आहेच. सासू- सुनेचं नातं हा नेहमीच आपल्याकडे चर्चेचा विषय असतो. मग त्यासाठी सेलिब्रिटी सासू- सुनेची जोडीही अपवाद नाहीत. मध्यंतरी आलियाचं आणि नीतू कपूर यांचं काहीतरी बिनसलंय अशा स्टोरी व्हायरल होत होत्याच. त्यात आता नितू कपूर यांनी स्वत:च त्यांचं आणि आलियाचं कुठे आणि कधी बिनसतं हे 'कॉफी विथ करण' (Coffee with Karan season 8) कार्यक्रमात सांगितलं आहे. (Neetu Kapoor explains about her mini battle with Alia Bhatt and Soni Rajdan)
कॉफी विथ करण या कार्यक्रमात नुकतीच अभिनेत्री नितू कपूर आणि झीनत अमान यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात दोघींनीही बऱ्याच विषयांवर भरभरून गप्पा मारल्या. त्यात नितू कपूर यांनी सांगितलेले अनेक किस्से व्हायरल झाले आहेत. करण जोहरने नितू कपूर यांना त्यांची नात राहाबाबत प्रश्न विचारला.
फक्त २ पदार्थ वापरा- गॅस शेगडीपासून ते तेलकट झालेल्या टाईल्सपर्यंत सगळं स्वयंपाकघरच होईल चकाचक
नातीबाबत भरभरून बोलताना नितू कपूर यांनी त्यांच्यात आणि आलियामध्ये तसेच आलियाच्या आई सोनी राजदान यांच्यामध्ये कशावरून मजेशीर वाद होतो हे ही सांगितले. त्या म्हणाल्या की राहाने 'पापा' हा शब्द बोलावा म्हणून मी आग्रही असते तर तिने 'मम्मा' आधी म्हणावं हा सोनी यांचा आग्रह असतो. मी तिला 'पापा' म्हणायला तर सोनी 'मम्मा' म्हणायला शिकवते.
पुढे त्या म्हणाल्या की असंच एकदा आलियाच्या घरी गेले असता तिने मला सांगितलं की राहाने पहिला शब्द 'मम्मा' म्हटला. त्यावर मी तिला सुनावलं की एवढी आनंदी होऊ नको.
विकतच्या हळदीपेक्षाही जास्त सुगंधी आणि चवदार हळद घरी तयार करा- बघा एकदम सोपी रेसिपी
ती 'मम्मा' नाही 'मम मम' असं म्हणते आहे. एवढंच नाही तर राहा 'दा- दा' असा शब्द उच्चारते 'ना- ना' नाही असंही मी वारंवार त्या दोघींना दाखवून देत असते.... राहाच्या प्रत्येक गोष्टीबाबत तिच्या दोन्ही आज्या किती उत्साही आहे, हेच यावरून दिसून येतं.