'प्यार होता होता कई बार है' अभिनेता रणबीर कपूरवर चित्रित हे गाणं प्रचंड गाजलं (Relationship Tips). पण खरंच प्रेम पुन्हा होतं का? लव्ह एट फर्स्ट साईट खरंच होतं का? पार्टनरसोबत नात्यात राहून दुसऱ्यांदा प्रेम होतं का? की ते फक्त ॲट्रॅक्शन आहे? सध्या रिलेशनशिपमध्ये अनेक प्रकार आले आहेत (Commitment). काही लोकं सिचुएशनशिपमध्ये राहतात. तर काही ओपन रिलेशनशिपमध्ये राहतात. तर काहींना रिलेशनशिपमध्ये असूनही, दुसऱ्याव्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं.
प्रत्येक नात्यात अनेक चढ-उतार येतात. कधी -कधी भांडणं इतके विकोपाला जातात, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे ॲट्रॅक्शन होतं. त्यामुळे नात्यात आणखीन दुरावा येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, एखाद्याच्या प्रेमात असताना दुसऱ्या कोणा व्यक्तीकडे आकर्षित होणं योग्य आहे का? याबद्दल प्रेडीक्शन फोर सक्सेस आणि रिलेशनशिप कोचचे संस्थापक विशाल भारद्वाज यांनी सल्ला आणि माहिती दिली आहे(Committed But Still Attracted to Someone Else?).
शारीरिक आकर्षण
नात्यात असतानाही आपल्याला इतरांकडे बघून, ॲट्रॅक्शन होऊ शकतं. कारण जेव्हा एखाद्याला आपल्या जोडीदारापेक्षा अधिक गुणी व्यक्ती आढळते, तेव्हा तो अनेकदा त्याच्याकडे आकर्षित होऊ लागतो. अशावेळी जोडीदाराची आठवण ठेवली पाहिजे. जोडीदारासोबत घालवलेले क्षण आठवायला हवे. फक्त दिसणे, पेहराव, पैसा आणि चांगली जीवनशैली आवश्यक नाही. तर पार्टनरने ठेवलेला ट्रस्ट महत्वाचा असतो.
एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..
आर्थिक अडचणी
अनेकवेळा आर्थिक समस्यांमुळे नात्यात भांडणे होतात. कारण माणसाला जोडीदाराकडून अनेक अपेक्षा असतात. जेव्हा ते पूर्ण होत नाही दुरावा येतो. मग जेव्हा आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करू शकेल अशी एखादी व्यक्ती सापडते, तेव्हा त्या व्यक्तीचे आकर्षण वाटणे सामान्य आहे. जर आपल्यालाही असेच वाटू लागले असेल तर, पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला. मनातील प्रत्येक गोष्ट शेअर करा. दोघे मिळून आर्थिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
नात्यात प्रामाणिकपणा महत्त्वाचा
कोणत्याही नात्यात ट्रस्ट महत्वाचा. जर आपल्याला कोणत्याही व्यक्तीला पाहून आकर्षण झालं असेल तर, स्वतःला रोखा. पार्टनरपासून कोणतीही गोष्ट लपवू नका. यामुळे ट्रस्ट तुटू शकतो. पार्टनरला शेअर करा, वेळ घालवा. यामुळे पार्टनर आपल्याला प्रेम आणि आकर्षणाबद्दल फरक समजावून सांगतील. शिवाय पार्टनरकडून काही चुका झाल्या असतील तर, त्यांना जरूर एक संधी द्या.
तुमचा जोडीदार सतत तुमचा मोबाइल तपासतो, मेसेज वाचतो? हे प्रेम - पझेसिव्हनेस की अविश्वास?
विचारपूर्वक निर्णय घ्या
एखाद्यावर प्रेम असताना पार्टनरने दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणे, ही गोष्ट नात्यात दुरावा निर्माण करते. अशावेळी शांत मनाने विचार करा. संयम बाळगा. पार्टनरसोबत शांततेने चर्चा करा. माहिती काढून, चर्चा करूनच तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.