Join us  

Condom Mistakes : कंडोम वापरताना  पुरूष करतात ५ चुका; गैरसमज टाळा; आरोग्य सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 4:59 PM

Condom Mistakes : कंडोम वापरण्याला नकार देणं ते चुकीच्या रीतीने वापरणं हे सुरक्षित संबंधांसाठी घातक आहे

एचआयव्हीसह अन्य आजार, गर्भधारणा टाळण्यासाठी आणि सुरक्षित सेक्ससाठी कंडोम वापरा अशी माहिती शासकीय स्तरापासून ते डॉक्टर्सपर्यंत सगळेजण देतात. कंडोम वापराबाबत अनेक गैरसमज आजही आपल्या समाजात आहे. (Sexual Health) पुरुष कंडोम वापरासाठी टाळाटाळ करतात, महिलांनी गर्भनिरोधक साधनं वापरावी असा आग्रह असतो. मात्र यासाऱ्यातूनही सुरक्षित शरीरसंबंधांसाठी कंडोम वापरले गेलेच, तर त्या वापरातही काही अगदीच सामान्य चुका होताना दिसतात. त्या चुका टाळल्या तर कंडोम वापर अधिक सुरक्षित आणि सुखकर होऊ शकतो. (5 Condom Mistakes You Should Never Make)

 

१) दातांनी कंडोमचं पाकीट उघडणं

दात किंवा नखांनी कंडोमचे पाकीट उघडू नये.

२) तपासून न पाहणं

कंडोम वापरण्यापूर्वी ते कुठेतरी फाटले किंवा कापले आहे का ते तपासून पहा.

३) ऐनवेळी वापर टाळा

सुरक्षित संबंधांसाठी अगदी ऐनवेळी कंडोम वापरणे टाळा, संबंधांपूर्वीच घाला.

४) एकच कंडोम अनेकदा वापरणं

अनेक पुरुष ही चूक अनेकदा करतात. त्यांना वाटते जर कंडोम फाटले नसेल तर ते पुन्हा वापरता येते. असे कधीच करू नका. यामुळेदोघांना संसर्ग होऊ शकतो किंवा तो फाटला तर गर्भधारणा देखील होऊ शकते. कोणताही कंडोम एकदाच वापरा.

५) एक्सपायरी डेट न पाहणं

अनेकदा असे होते की एकदा तुम्ही कंडोमचे संपूर्ण पॅकेट विकत घेतले, परंतु त्यापैकी एक किंवा दोन वापरले नाहीत आणि ते पडून राहते. एक्सपायरी डेट उलटून जाते. असे एक्सपाअर झालेले कंडोम तुम्हाला आवश्यक संरक्षण देऊ शकत नाही आणि तुम्ही संसर्गाचे बळी ठरू शकता. त्यामुळे अशी चूक करू नका.

टॅग्स :लैंगिक आरोग्यलैंगिक जीवनहेल्थ टिप्सरिलेशनशिप