Join us  

Dating advice : फक्त हॅण्डसम लूक्स अन् पैसे नाही तर पुरूषांमधल्या 'या' ४ गोष्टींवर इम्प्रेस होतात सर्वाधिक महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 12:42 PM

Dating advice : तुम्ही जसे आहात तसे राहिलात तर तिला तुमची पर्सनॅलिटी जास्त आवडेल. गरज नसताना जास्त स्मार्ट वागण्याचा प्रयत्न करू नका.

पुरूषांप्रमाणेच स्त्रिया एखाद्या व्यक्तीशी बोलतात तेव्हा त्या व्यक्तीबद्दल आपलं मत ठरवतात. मुलींना फक्त गुड लूक्स, पैसे आणि चांगली राहणीमान असलेली मुलं आवडतात असं वरकरणी पाहता लक्षात येतं. (Relationship Tips) पण याशिवाय इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पुरूषांमधले पाहिल्या जातात त्यातून संवादाची आणि नात्याची दिशा ठरत असते. म्हणूनच या लेखात तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे मुली तुमच्यावर एम्प्रेस होऊ शकतात याबाबत सांगणार आहोत. (Dating advice for men and women)

ड्रेसिंग

 तुम्ही ज्या पद्धतीने कपडे घालता ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच टिव्ही स्टार्ससारखे दिसावे, परंतु फॉर्मल पॅंटवर स्पोर्ट शूज घालण्यासारख्या मूर्ख फॅशनच्या चुका करणे टाळा. तुम्हाला कल्पना नसेल, पण  या सर्व गोष्टींचा समोरच्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो.

आत्मविश्वास

स्त्रियांना धीट, स्पष्ट आणि आत्मविश्वास असलेले पुरुष आवडतात. सुरुवातीच्या संभाषणादरम्या त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की तुमचा किती आत्मविश्वास आहे आणि तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टींकडे कसे पाहता.. स्त्रीशी बोलताना सकारात्मक आणि नम्र राहा आणि तुमचा मुद्दाही मांडा.  तुम्ही जसे आहात तसे राहिलात तर तिला तुमची पर्सनॅलिटी जास्त आवडेल. गरज नसताना जास्त स्मार्ट वागण्याचा प्रयत्न करू नका.

सेन्स ऑफ ह्यूमर

स्त्रिया अशा मुलांवर प्रेम करतात ज्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर कमालीचा असतो आणि जे त्यांना हसवू शकतात. नात्याची चांगली सुरूवात करण्यासाठी सुरूवातीला विनोदी पद्धतीनं काही बोलण्याचा प्रयत्न करा. पहिल्या संभाषणादरम्यान एडल्ट विनोद टाळा आणि चांगल्या हेल्दी विनोदाने बोनस पॉइंट मिळवा.

शरीरयष्टी

तुमची शरीरयष्टी साधारण मुलींना पहिल्याच भेटीत लक्षात येते. यामध्ये उंचीपासून, केस, डोळे आणि बरेच काही समाविष्ट आहे. म्हणून, बाहेरून आकर्षक दिसण्यसाठी स्वत:वर थोडी मेहनत घ्या. वैयक्तिक ग्रूमिंगबद्दल विसरू नका. उदाहरणार्थ, आपले हात आणि नखं स्वच्छ ठेवा,  व्यायामसाठी थोडा वेळ काढा. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप