Lokmat Sakhi >Relationship > दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग ट्रोल होत आहेत. पण ओपन रिलेशनशिप ही गोष्ट आता अनेकांच्या संदर्भात खरी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 03:34 PM2023-11-01T15:34:56+5:302023-11-01T15:36:03+5:30

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग ट्रोल होत आहेत. पण ओपन रिलेशनशिप ही गोष्ट आता अनेकांच्या संदर्भात खरी आहे.

Deepika Padukone says she and Ranveer Singh were ‘technically allowed’ to date other people ‘until he proposed’: ‘There was no real commitment’ | दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

दीपिका पादुकोण ट्रोल होतेय, मात्र ओपन रिलेशनशिपचा निर्णय अनेकजण का घेतात? कमिटमेण्टची भीती की..

बहुचर्चित कॉफी विथ करणचा (Koffee with Karan) आठवा सिझन सुरु झाला. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी हजेरी लावली. या एपिसोडमध्ये दोघांनी लग्न, डिप्रेशन, एकाकीपण याविषयी मोकळेपणानं चर्चा केली. नैराश्य माणसाला जगणं कसं नकोसं करतं याविषयीही दीपिका बोलली. पण ती ट्रोल मात्र भलत्याच गोष्टीने होते आहे.

लग्नापूर्वी आम्ही ओपन रिलेशनशिपमध्ये होतो. काही इतरजणांना मी भेटत होते पण मनात रणवीरशी कमिटमेंट होती अशा अर्थाचं दीपिका बोलली. त्यावरुन सोशल मीडियात मिम्स झाले, ती ट्रोलही झाली(Deepika Padukone says she and Ranveer Singh were ‘technically allowed’ to date other people ‘until he proposed’: ‘There was no real commitment’).

दीपिका नेमकं काय म्हणाली?

''सुरुवातीला रणवीरसोबतच्या रिलेशनशिपमध्ये सीरिअस नव्हते. कारण त्याआधीचे दोन रिलेशनशिप माझ्यासाठी त्रासदायक ठरले होते. त्यामुळे मला सिंगल रहायचं होतं. मला कोणालाच कमिटमेण्ट द्यायची नव्हती. सुरुवातीला मी रणवीरसोबतही सीरिअस नव्हते. मात्र जेव्हा त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं, तेव्हापासून मी रणवीरचा सीरिअसली विचार करू लागले. मात्र त्यावेळीही आम्ही दोघं ओपन रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही दोघंही एकमेकांपासून फार लांब राहू शकलो नाही.'' तिच्या याच वक्तव्यामुळे सोशल मीडियात प्रचंड ट्रोल झाली.

ऐश्वर्या रायला विश्वसुंदरी आणि अभिनेत्री व्हायचे नव्हते तर.. पाहा ऐश्वर्याविषयी माहीत नसलेल्या ९ गोष्टी

लिव्ह-इन आणि ओपन रिलेशनशिपमध्ये फरक काय?

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये पुरुष आणि स्त्री लग्न न करता परस्पर संमतीने एकत्र राहतात. यादरम्यान दोघेही एकमेकांना जवळून ओळखतात, आणि लग्न करायचं की नाही हे ठरवतात. पण ओपन रिलेशनशिपमध्ये असे होत नाही. ओपन रिलेशनशिपमध्ये, दोघेही अन्य लोकांना डेट करु शकतात, भेटू शकतात. म्हणजे दुसऱ्या नात्याचाही विचार करु शकतात.

'मैने प्यार किया'तली सुमन आजही दिसते तरुण, पाहा तिचं सिक्रेट ग्रीन लंच- हिरव्यागार जेवणाची रंगत

ओपन रिलेशनशिपवर टीका होत असतेच पण कमिटमेण्ट नको अजून पर्याय तपासून मग लग्नाचा किंवा कमिटमेण्टचा अगदी लिव्ह इनचाही निर्णय घेऊ असं मानणारे अनेकजण असतात. काहीजण रणवीर-दीपिकासारखं आपलं नातं पुढे नेऊन लग्न करतात, संसारातही रमतात.

Web Title: Deepika Padukone says she and Ranveer Singh were ‘technically allowed’ to date other people ‘until he proposed’: ‘There was no real commitment’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.